AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी

वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) बुधवारी सांगितले की, ते एक स्वतंत्र मार्केटप्लेस मॉडेल 'फ्लिपकार्ट एक्सट्रा' (Flipkart Xtra) सादर करत आहेत.

Flipkart Xtra : फेस्टिव्ह सीझनपूर्वी फ्लिपकार्टने नोकऱ्यांचा पेटारा उघडला, 4000 हून अधिक नोकरीच्या संधी
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 22, 2021 | 11:37 PM
Share

नवी दिल्ली : वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) बुधवारी सांगितले की, ते एक स्वतंत्र मार्केटप्लेस मॉडेल ‘फ्लिपकार्ट एक्सट्रा’ (Flipkart Xtra) सादर करत आहेत. जेणेकरून इनडिव्हिज्युअल, सेवा संस्था आणि तंत्रज्ञांना कमाईच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. ‘फ्लिपकार्ट एक्स्ट्रा’ अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याद्वारे फ्लिपकार्ट इच्छुक व्यक्तींना एक सोपा अनुभव प्रदान करेल. (Flipkart launches Flipkart Xtra to onboard part-time job seekers, will create over 4,000 jobs)

बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशननंतर इनडिव्हिज्युअल विविध भूमिकांसाठी स्वतःला ऑनबोर्ड करण्यास सक्षम असतील, असे एका निवेदनात म्हटले आहे. जे येत्या काही महिन्यांत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हसह सुरू होईल आणि नंतर सर्विस पार्टनर किंवा टेक्नीशियनन्सचा समावेश असेल. त्यात म्हटले आहे की नवीन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टची पुरवठा साखळी मजबूत करण्यास मदत करेल. यासह, पार्ट टाइम जॉब्स निर्माण केले जाऊ शकतात.

डिसेंबर 2021 पर्यंत 4,000 पार्ट-टाइम असोसिएट जोडण्याचे लक्ष्य

सणासुदीचा हंगाम आणि कंपनीच्या बिग बिलियन डेजच्या अगोदर लाँच केल्याने देशभरातील हजारो व्यक्ती, तंत्रज्ञ आणि सेवा एजन्सींना डिलिव्हरी पार्टनर म्हणून अतिरिक्त काम आणि कमाईच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. डिसेंबर 2021 पर्यंत फ्लिपकार्ट एक्स्ट्राद्वारे 4,000 पार्ट-टाइम असोसिएट जोडण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

7 ऑक्टोबरपासून Flipkart बिग बिलियन डेज सेल

सध्या सणांचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान, फ्लिपकार्टने त्यांच्या बिग बिलियन डेज सेलची तारीख जाहीर केली आहे. हा सेल 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 12 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.

Big Billion Days : Poco, Moto, Pixel फोनवर बंपर डिस्काऊंट

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल लवकरच सुरू होणार आहे. फ्लिपकार्टने अद्याप त्याच्या तारखा जाहीर केल्या नाहीत, मात्र लवकरच कंपनी या सेलच्या तारखा जाहीर करून स्मार्टफोन डील्सबद्दल खुलासा करू शकते. फ्लिपकार्टच्या वार्षिक सेलमध्ये तुम्हाला नवीन फोनवर सवलत मिळेल. यात अनेक लोकप्रिय फोन समाविष्ट करण्यात आले आहेत. सूचीमध्ये तुम्हाला Pixel 4a, Poco X3 Pro, Moto Edge 20 Fusion, Asus Rog Phone 3 आणि Infinix Hot 10s वर सूट मिळू शकते. याशिवाय, तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1000 रुपयांची सूट देखील मिळवू शकता.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Flipkart launches Flipkart Xtra to onboard part-time job seekers, will create over 4,000 jobs)

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...