Flipkart Sale : Iphone, Realme, Moto च्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटने पुन्हा एकदा स्मार्टफोन सेलची घोषणा केली आहे. (Mobile Bonanza Sale)

Flipkart Sale : Iphone, Realme, Moto च्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट
Flipkart
अक्षय चोरगे

|

Apr 07, 2021 | 1:59 PM

मुंबई : फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटने पुन्हा एकदा स्मार्टफोन सेलची घोषणा केली आहे. हा मोबाइल बोनान्झा सेल (Mobile Bonanza Sale) कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह झाला आहे, जो 11 एप्रिलपर्यंत चालणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आयफोन 11, आयफोन XR आणि आयफोन SE सारख्या आयफोनवर बंपर डिस्काऊंट देण्यात आला आहे. त्याच वेळी, आपल्याला या सेलमध्ये रियलमी नार्झो या स्मार्टफोनवरही सूट मिळू शकते. या सेलमध्ये नुकताच लाँच केलेला मोटो जी 10 पॉवर देखील सवलतीच्या दरात विकला जात आहे. (Flipkart Mobiles Bonanza Sale : iPhone 11, iPhone SE, Moto G10 Power, Realme X7 pro discounts)

यासोबतच ग्राहकांना या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज आणि इतर ऑफर्स देण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ तुम्ही डिस्काऊंटेड किंमतीसह अधिक डिस्काऊंट मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात तुमच्यासाठी कोणती डील परफेक्ट आहे.

आयफोन 11 (Iphone 11)

अॅपल स्टोरमध्ये आयफोन 11 ची किंमत 54 हजार 900 रुपये इतकी आहे. परंतु या सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 46,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ई-कॉमर्स जायंट या सेलमध्ये आयफोन 11 वर थेट 8000 रुपयांची सूट देत आहे. तसेच जर तुमच्याकडे अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 5 टक्क्यांची सूट मिळू शकते.

आयफोन SE (Iphone SE)

आयफोन SE चं 64 जीबी व्हेरिएंट अॅपल स्टोरवर 39,999 रुपयांमध्ये विकलं जात आहे. परंतु फ्लिपकार्टवर या फोनची डिस्काऊंटेड किंमत 29,999 रुपये इतकी आहे. या फोनवर 10 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. तसेच जर तुमच्याकडे अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 5 टक्क्यांची सूट मिळू शकते.

मोटो जी 10 पॉवर (Moto G 10 Power)

हा फोन कंपनीने नुकताच 9999 रुपये इतक्या किंमतीसह लाँच केला होता. आता या फोनवर कंपनीने 500 रुपयांचा डिस्काऊंट देऊ केला आहे. या फोनची मूळ किंमत 9499 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासह येतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन क्वालकॉम 480 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

रियलमी X7 प्रो (Realme X7 Pro)

रियलमी X7 प्रो या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये 27,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर त्यावर तुम्हाला 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. ही ऑफर 7 एप्रिल ते 1 एप्रिलपर्यंत वैध आहे.

इतर बातम्या 

Flipkart TV Days : बंपर डिस्काऊंटसह MI, Samsung, LG कंपनीचे स्मार्ट टीव्ही खरेदीची संधी

64 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, खास गेमर्ससाठी डिझाईन केलेला Samsung चा स्मार्टफोन लाँच

(Flipkart Mobiles Bonanza Sale : iPhone 11, iPhone SE, Moto G10 Power, Realme X7 pro discounts)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें