Car Loan : कार खरेदी करताय? झटपट कार लोनसाठी ‘या’ गोष्टींची आधीच पूर्तता करा…
अनेकांना कार खरेदीसाठी एकदम मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याने अनेक जण कार लोन घेत असतात. अशात कार लोनसाठी अनेक किचकट अटी, नियमावली, कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असते. त्यामुळे कार लोनसाठी अर्ज करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेतल्यास ही प्रक्रिया अत्यंत सुलभ स्वरुपात होत असते.

मुंबई : घरात नवीन कार आणण्यासारखा दुसरा आनंद नसतो. अन् जर ती तुमची पहिलीच कार (First car) असेल, तर मग एखादी कुटुंबातील सदस्याचे आपण जसे स्वागत करतो; त्याप्रमाणे कारचे स्वागत केले जात असते. आज काल कार ही सर्वांच्याच जिवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. कुठल्याही लांबवरच्या प्रवासासाठी कार असल्यास प्रवास अधिक आरामदाय होत असतो. अनेकांना कार खरेदीसाठी एकदम मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याने अनेक जण कार लोन (car loan) घेत असतात. अशात कार लोनसाठी अनेक किचकट अटी, नियमावली, कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असते. त्यामुळे कार लोनसाठी अर्ज (Application) करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेतल्यास ही प्रक्रिया अत्यंत सुलभ स्वरुपात होत असते. यामुळे तुमचे कार लोनदेखील त्वरित पास होउ शकते.
वेळेत कर्ज फेडा
वेळेत आपले कर्ज फेडणार्या ग्राहकांना बँकेकडून प्राधान्य दिले जाते. जर तुम्ही पहिल्यापासूनच होम लोन, पर्सनल लोन किंवा अन्य कुठलेही लोन घेतले असेल तर अशात तुमचा ईएमआय वेळेत भरणे आवश्यक ठरणार आहे. हीच गोष्ट ग्राहकांच्या क्रेडिट कार्डवर देखील लागू होत असते. वेळेत कर्जाचे हप्ते भरल्याने पेनल्टी तर वाचतेच शिवाय ग्राहकांचा क्रेडिट रेकॉर्डदेखील चांगला राहण्यास मदत होत असते.
क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा
जर ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर कमी असेल तर अशा वेळी त्याला वाढविण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. आपण जुने घेतलेले कर्ज निल केले आहे, की नाही याची तपासणी केली पाहिजे. ग्राहकांनी आपल्या क्रेडिट कार्डच्या लिमिटला पाहून त्याचा वापर करावा, आपल्या क्रेडिट कार्डच्या लिमिटला वाढवल्यास याचा सकारात्मक परिणाम ग्राहकांना स्कोअरमध्ये पाहता येईल.
विविध बँकेच्या पात्रता जाणून घ्या
कर्ज देताना वेगवेगळ्या बँका आपआपले मापदंड लावत असतात. कर्ज घेत असलेल्या ग्राहकांची वार्षिक इनकम, लोन अमाउंट यांचा अभ्यास करुन कर्ज दिले जात असतात. त्यामुळे आपण कुठल्या बँकेच्या पात्रतेत बसतोय, याची माहिती ग्राहकांनी लोन काढण्यापूर्वी घ्यावी.
डाउन पेमेंट आणि कागदपत्रे
कार लोनसाठी कर्ज देताना ग्राहकाने किमान 15 ते 20 टक्के गाडीची रक्कम डाउन पेमेंटच्या स्वरुपात भरावी, अशी अपेक्षा बँकांची असते. त्यामुळे जेवढे जास्त डाउन पेमेंट तेवढे कर्जाचे हप्ते कमी असतात. त्यामुळे कार खरेदी करताना ग्राहकांनी डाउन पेमेंटची तजवीज करावी. या शिवाय काही बँका 100 टक्के फायनांसचीही सुविधा उपलब्ध करुन देत असतात. कर्ज देताना बँकांना ग्राहकांची काही महत्वाची कागदपत्रे लागतात. अशा वेळी त्यांची आधीच जुळवाजुळव करुन ठेवावी.
