फोटो एडिटची नको चिंता, Google AI मुळे Photo ला लागणार चार चांद

Google Magic Editor: गूगल फोटो ॲपवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आधारे फोटो एडिट करता येईल. त्यामुळे कॅमेरा किंचित हलला अथवा कमी प्रकाश असेल तरी तुमचा फोटो एकदम चकाचक होईल. या एडिटिंग ॲपचा मोफत वापर करता येईल.

फोटो एडिटची नको चिंता, Google AI मुळे Photo ला लागणार चार चांद
फोटोवर गुगल एआयचं मॅजिक
Follow us
| Updated on: Aug 01, 2024 | 3:38 PM

Google Photos AI Editing : कॅमेरा किंचित हलला, कमी प्रकाशात फोटो काढला, तर त्या फोटोचा दर्जा, गुणवत्ता कमी असेल. पण हा फोटो आता डिलिट करण्याची गरज नाही. तुम्हाला फोटो सुधारता येईल. त्यासाठी प्रोफेशनल एडिटिंग स्किल्सची गरज नाही. गुगल फोटो ॲपवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आधारे एकदम क्लासिक फोटो एडिट करता येईल. तुमचा फोटो मोफत चकाचक होईल. यापूर्वी फोटो एडिट करण्यासाठी गुगल एआय शुल्क आकारत होते. पण आता ही सेवा निःशुल्क आहे.

एप्रिलमध्ये गुगल एआयची हवा

गुगलने एआय फोटो एडिटिंग टुल्स या वर्षी एप्रिल महिन्यात आणले होते. यापूर्वी त्याचा वापर करण्यासाठी सब्सक्रिप्शनची गरज होती. पण आता युझर्स त्याचा मोफत वापर करु शकतील. अर्थात अँड्रॉईड आणि iOS वर एआय फोटो एडिटिंगसाठी अजून थोडा कालावधी लागू शकतो. लवकरच ही सुविधा उपलब्ध होईल.

हे सुद्धा वाचा

गुगल फोटो एआय एडिटिंग फीचर्स

गुगलच्या फोटो एडिटिंग टुल्समध्ये मॅजिक एडिटर, मॅजिक इरेजर, फोटो अनब्लर आणि पोर्टरेट लाईट फीचर्स येतात. जेनरेटिव्ह एआय, मॅजिक एडिटरच्या मदतीने तुम्ही अगदी खराब फोटो पण सहज चांगला होऊ शकतो. सब्जेक्ट रीपोझिशन करणे असो वा रंग संगती करण्याची सुविधा या फीचरमुळे मिळेल.

फोटो सुधारण्यासाठी AI

गुगल फोटो एआय एडिटिंग टुल्सचा वापर करणे अत्यंत सोपे आहे. एआयच्या मदतीने फोटो एडिट करणे सोपे आहे. एआयच्या मदतीने तुम्ही फोटो अजून चांगला करु शकता. एआयने दुरुस्त केलेला फोटो तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही फाईन ट्यून रिझल्टचा पर्याय निवडू शकता. फोटो एडिटिंग टुल्समध्ये पोर्टरेट लाईट आणि फोटो अनब्लर, स्लाईड इंटेंसिटी ॲडजस्ट करण्याचे फीचर आहे.

या डिव्हाईसवर Google Magic Editor

यापूर्वी मॅजिक एडिटर केवळ पिक्सल 8 स्मार्टफोनसाठी होता. पण आता ते सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गुगल फोटो युझर्स दर महिन्याला 10 मॅजिक एडिटर फोटो सेव्ह करता येतात. मॅजिक इरेजर फीचरच्या मदतीने फोटोतील अनावश्यक बाबी बाजूला करु शकतात. सध्या गुगल एआय फोटो एडिटिंग तुम्ही अँड्राईड 8.0 वा iOS 15 वा कमीत कमी 3GB रॅम डिव्हाईस असणे आवश्यक आहे.

'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ
'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ.
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड...
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड....
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या.
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं.
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर.
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार.
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा.
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर.
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय..
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय...