AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगलने युजर्सना दिला 440 वॅटचा धक्का, आता ‘या’ स्मार्टफोन्सवर चालवता येणार नाही क्रोम

अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांना मोठा धक्का देत गुगलने एक मोठी घोषणा केली आहे, कंपनीने लवकरच काही वापरकर्त्यांसाठी क्रोम सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या या निर्णयाचा तुमच्यावर परिणाम होईल की नाही याबद्दल माहिती देणार आहोत.

गुगलने युजर्सना दिला 440 वॅटचा धक्का, आता 'या' स्मार्टफोन्सवर चालवता येणार नाही क्रोम
Google chrome Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 25, 2025 | 2:19 PM
Share

आपण सर्वजण गुगल क्रोमचा सर्वाधिकरित्या वापर करत असतो. अशातच गुगल क्रोम हा जगभरातील एक अतिशय लोकप्रिय ब्राउझर आहे. जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या वेबब्राउझर गुगल क्रोमचा वापर करतात. तर यामध्ये संगणकापासून तू मोबाईल वापरकर्त्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची माहिती शोधण्यासाठी गुगल क्रोमचा वापर करत असतो. असे अनेकजण आहेत जे त्यांच्या छोट्या कामांसाठीही गुगल क्रोमचा वापर करत असतात. पण आता गुगलने या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी क्रोम सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अनेकदा गुगलने क्रोम बंद केल्याचे घडले आहे. त्यातच गुगलच नाही तर व्हॉट्सॲप सपोर्ट देखील जुन्या स्मार्टफोनमध्ये बंद केले आहेत. पण गुगल किंवा इतर कोणतीही कंपनी असे का करते आणि यावेळी गुगलच्या या निर्णयाचा कोणत्या वापरकर्त्यांवर परिणाम होईल? आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत, तसेच तुम्हाला सांगणार आहोत की जर तुम्हाला गुगल क्रोम वापरणे सुरू ठेवायचे असेल तर यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? चला तर मग जाणून घेऊयात…

गुगलच्या निर्णयामुळे या स्मार्टफोन्स वापरकर्त्यांना फटका

अँड्रॉइड 8 (ओरिओ) आणि अँड्रॉइड 9 (पाई) वर चालणाऱ्या स्मार्टफोन्सना आता गुगल क्रोम सपोर्ट करणे बंद केला जात असल्याची माहिती गुगलने दिली आहे. कंपनीने या दोन्ही मॉडेल्सवर चालणाऱ्या फोन्ससाठी अंतिम Chrome Version 138 जारी केले आहे. पाच वर्षांपूर्वी या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये हा ब्राउझर काम करेल, परंतु कंपनी या स्मार्टफोन्सना फ्यूचर अपडेट्स आणि सुरक्षा पॅच देणार नाही.

जेव्हा कंपनी जुन्या फोनसाठी सपोर्ट थांबवते तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमच्या वयक्तिक महितीला धोका आहे कारण तुम्हाला सुरक्षा पॅचसह अपडेट मिळत नाहीत. जुन्या फोनसाठी सपोर्ट बंद करण्यात आला आहे कारण कंपनी नवीनतम वर्जनसह फोन वापरणाऱ्या लोकांना चांगल्या सुविधा देण्यावर लक्ष केंद्रित करते.

मदत कधी थांबेल?

आता प्रश्न असा आहे की, या मॉडेल्सना कोणत्या दिवसापासून सपोर्ट मिळणे बंद होईल? कंपनीच्या मते, 5 ऑगस्ट 2025 नंतर तुम्ही या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर गुगल क्रोम वापरू शकणार नाही. जर तुम्हाला क्रोम 139 आणि सुरक्षा अपडेट हवे असतील तर यासाठी तुम्हाला अँड्रॉइड 10 किंवा त्यावरील मॉडेलवर चालणारा फोन खरेदी करावा लागेल.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.