जिओला टक्कर देणारा गुगलचा नवा फोन, किंमत फक्त…

जिओला टक्कर देणारा गुगलचा नवा फोन, किंमत फक्त...

मुंबई : गुगल आता नवीन फोन लाँच करणार आहे . हा फोन रिलायंस जिओला टक्कर देऊ शकतो असं बोललं जात आहे. गुगलच्या या फोनचं नाव विझफोन (WizPhone WP006) असून हा फोन इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. इंडोनेशियामध्ये या फोनची किंमत 99,000 रुपिहा म्हणजेच भारतीय चलनानुसार 500 रुपये आहे. गुगलचा फोन लूकमध्ये जिओ फोन सारखाच दिसतो आहे. मात्र या फोनमध्ये KaiOS सोबत गुगल असिस्टंट हे फीचरही उपलब्ध आहे. ज्यामुळे या फोनमध्ये युजर्स व्हॉईस कमांडचा लाभ घेऊ शकतात.

गुगलच्या या नवीन फोनमध्ये युजर्सला व्हॉट्सअॅपही वापरता येणार आहे. सुत्रानूसार गुगलने KaiOS मध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे विजफोन डब्ल्यूपी 006 गुगल असिस्टंट शिवाय गुगल मॅप, गुगल सर्च, फेसबुक आणि युट्यूबलाही सपोर्ट करेल.

भारतात हा फोन कधी लाँच होणार याबद्दल गुगलने अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. विझफोनला हे गुगलचे स्वत:चे प्रोडक्ट नसून, केवळ या फोनवर आपली सेवा देणार आहे. गुगलची सेवा मिळत असल्यामुळे हा साधारण फोन काही लोकांसाठी खुप फायदेशीर ठरणार आहे. जर गुगलने या फोनला भारतात लाँच केले तर जिओसाठी नक्कीच डोकेदुखी बनेल.

गुगल विझफोन फीचर

  • 2.4 इंच डिस्प्ले
  • 512 रॅम
  • 4 जीबी इंटरनल स्टोरेज
  • 2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
  • 1 वीजीए सेल्फी कॅमेरा
  • KaiOS कार्यप्रणाली
  • बॅटरी 18001800mAh

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI