AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Pixel 10 vs Google Pixel 9: या दोन स्मार्टफोनमध्ये नेमका काय फरक? जाणून घ्या सर्वकाही

मोबाईल कंपन्या ठराविक कालावधीनंतर बाजारात अपडेट वर्जन सादर करते. गुगल पिक्सेलने 10 वर्जन लाँच केलं आहे. पिक्सेल 9 चं अपग्रेड वर्जन आहे. त्यामुळे या दोन्ही फोनमध्ये नेमका फरक काय? असा प्रश्न मोबाईलप्रेमींना पडला आहे. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

Google Pixel 10 vs Google Pixel 9: या दोन स्मार्टफोनमध्ये नेमका काय फरक? जाणून घ्या सर्वकाही
Google Pixel 10 vs Google Pixel 9: या दोन स्मार्टफोनमध्ये नेमका काय फरक? जाणून घ्या सर्वकाहीImage Credit source: गूगल स्टोर
| Updated on: Aug 21, 2025 | 7:58 PM
Share

गुगल पिक्सेल 10 सीरिज भारतात लाँच झाला आहे. त्यामुळे या मोबाईबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारण पिक्सेल 10 मध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फ्लॅगशिप फीचर्स दिले आहेत. तुम्हालाही हा नवाकोरा फोन विकत घ्यायचा असेल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण या बातमीतून तुम्हाला पिक्सेल 9 आणि पिक्सेल 10 मधील फरक समजून येईल. या दोन्ही फोनमध्ये नेमकं काय अंतर ते देखील तुम्हाला कळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही मोबाईलची किंमत काय? तर गुगल पिक्सेल 10 स्मार्टफोनच्या 256 जीबी व्हेरियंटची किंमत 79,999 रुपये आहे. विशेष म्हणजे सिंगल व्हेरियंट मोबाईल आहे. दुसरीकडे, पिक्सेल 9256 जीबी व्हेरियंटसाठी फ्लिपकार्टवर किंमत 64999 रुपये आहे. चला जाणून घेऊयात इतर फरक

Google Pixel 9 vs Pixel 10 Specifications

डिस्प्ले : गुगल पिक्सेल 10 आणि पिक्सेल 9 मध्ये 6.3 इंचाची ओलेड डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 60 ते 120 हर्ट्जपर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. पण तुम्हाला यात एक फरक दिसून येईल. तो म्हणजे पीक ब्राइटनेसचा.. पिक्सेल 10 मध्ये 3000 निट्स पीक ब्राइटनेस आहे. तर पिक्सेल 9 मध्ये 2700 निट्स पीक ब्राइटनेस आहे. त्यामुळे पिक्सेल 10 वरचढ आहे.

बॅटरी : पिक्सेल 10 मध्ये 4970 एमएएचची बॅटरी आहे. त्यामुळे या मोबाईलची ताकद दिसून येते. कारण मोबाईलच्या बॅटरीवर बरंच काही अवलंबून असतं. 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हा फोन 15 वॉट Qi2 वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. दुसरीकडे, पिक्सेल 9 मध्ये 4700 एमएएचची बॅटरी आहे. ही बॅटरी 27 वॉट वायर्ड आणि 15 वॉट वायरलेस चार्जला सपोर्ट करतो.

चिपसेट : पिक्सेल 10 मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी 3एनएम बेस्ड टेंसर जी5 प्रोसेसरसह टाइटन एम2 चिप दिली आहे. तर पिक्सेल 9 मध्ये हँडसेटमध्ये टेन्सर जी4 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, पिक्सेल 10 मधील प्रोसेसर हा पिक्सेल 9 पेक्षा 34 टक्क्यापर्यंत वेगवान आहे.

कॅमेरा: गुगल पिक्सेल 10 मध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा सेन्सर आहे. पिक्सेल 9 मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 48 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये 10.5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.