लाँचिंगपूर्वी Google Pixel 6 Series चे स्पेसिफिकेशन्स लीक, मिळणार ढासू फीचर्स, Apple ला टक्कर

गुगलने आपल्या पिक्सेल लाइनअपचा आधीच खुलासा केला आहे, कंपनी आता पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो लाँच करण्यासाठी सज्ज आहे. गुगलने या स्मार्टफोनचे फीचर्स देखील उघड केले आहेत.

लाँचिंगपूर्वी Google Pixel 6 Series चे स्पेसिफिकेशन्स लीक, मिळणार ढासू फीचर्स, Apple ला टक्कर

मुंबई : गुगलने आपल्या पिक्सेल लाइनअपचा आधीच खुलासा केला आहे, कंपनी आता पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो लाँच करण्यासाठी सज्ज आहे. गुगलने या स्मार्टफोनचे फीचर्स देखील उघड केले आहेत. पण कंपनीने अद्याप लॉन्चिंग डेटबद्दल माहिती दिलेली नाही. त्याच वेळी, काही सूत्रांकडून असे समजले आहे की, पिक्सेल 6 ची लॉन्च तारीख उघड झाली आहे. लीकनुसार, ही सिरीज 19 ऑक्टोबर रोजी लाँच केली जाऊ शकते. (Google Pixel 6 Series Specifications Leaked Before Launch)

गुगल पिक्सेल 6 सिरीजमध्ये कंपनी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देईल. मागच्या अहवालात सांगण्यात आले होते की, त्यात 33W चार्जिंग ब्रिक दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे आतापर्यंत पिक्सेल फक्त 18W चार्जिंग स्पीडला सपोर्ट करत असे. गुगलबद्दल असेही सांगितले जात आहे की, कंपनी पिक्सेल 6 लाँच इव्हेंटमध्ये स्वतःचा फोल्डेबल फोन देखील सादर करु शकते.

संभाव्य फीचर्स

आधीच्या काही अहवालांमध्ये असे दिसून आले आहे की, आगामी पिक्सेल 6 सिरीजमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले जातील. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी, 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज स्पेस पिक्सेल 6 प्रो मध्ये देण्यात येईल. त्याचबरोबर, गुगलने असेही म्हटले आहे की, आगामी पिक्सेल 6 सिरीजमध्ये इन-हाउस टेंसर चिपसेट दिला जाईल.

दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्टॅक रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, जो बंपच्या आत ठेवला जाईल. त्याच वेळी, पिक्सेल 6 प्रो हा पिक्सेल 6 स्मार्टफोनपेक्षा मोठा असेल. जर कंपनी Apple iPhone 13 लाँच होण्याच्या एक दिवस आधी हा स्मार्टफोन लाँच करत असेल, तर नक्कीच काही मोठे नियोजन असणार हे स्पष्ट आहे. यावेळी कंपनी नक्कीच काहीतरी नवीन सादर करु शकते.

वर्षअखेर Google Pixel Fold लाँच होणार

गुगलने फोल्डेबल पिक्सेल (Google Pixel Fold) फोनचे संकेत देऊन काही वर्ष लोटली आहेत. आता कंपनीने यात थोडीफार प्रगती केली आहे. याबाबतचा डेटा कंपनीने सार्वजनिक केला आहे, अशी अपेक्षा आहे की, Google 2021 च्या अखेरीस हे डिव्हाईस लाँच करेल. डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टंट्सचे वरिष्ठ संचालक डेव्हिड नारंजो यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नारंजो यांनी नुकत्याच केलेल्या एक ट्वीटमध्ये अशा डिव्हाईसेसची लिस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये SDC कडून LTPO OLED पॅनेल वापरण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये गुगल पिक्सेल फोल्डचे नाव देखील समाविष्ट आहे.

नारंजो यांच्या ट्विटनुसार, एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले गुगलच्या पिक्सेल फोल्डवर वापरता येईल. पिक्सेल फोल्डची लाँचिंग टाइमलाइन दर्शविण्याची ही पहिली वेळ नाही. जीएसएम एरिनाच्या मते, गुगलने पिक्सेल 6 सीरिज लाँच करण्याची तयारी केल्यामुळे, टेक दिग्गज कंपनी या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आगामी पिक्सेल फोल्डची घोषणा देखील करू शकते. अहवालात असे म्हटले आहे की गुगल 19 ऑक्टोबर रोजी आपली पिक्सेल 6 सिरीज लॉन्च करेल. हार्डवेअर डेव्हलपमेंटच्या सूचनांसह, Google फोल्डेबल डिव्हाइसेससाठी अधिक कस्टमाइज Android सक्रियपणे पुढे नेण्यासाठी ओळखले जाते. तथापि, फोल्डेबल स्मार्टफोनसाठी प्लॅटफॉर्म सक्षम करण्यासाठी इतर OEM द्वारे हे माध्यम म्हणून सुरू झाले.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Google Pixel 6 Series Specifications Leaked Before Launch)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI