Pegasus झाला जुना आता स्पायवेअर; पाळत ठेवण्यासाठी, हाय-प्रोफाइल लोकांची हेरगिरी करण्यासाठी वापरले जात आहे स्पायवेअर!

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, हर्मिट हा नवीन अँड्रॉइड स्पायवेअर आहे. हे सरकार हाय-प्रोफाइल लोकांना लक्ष्य करण्यासाठी वापरत आहे. या स्पायवेअरच्या माध्यमातून ज्या हाय-प्रोफाईल लोकांना लक्ष्य केले जात आहे.

Pegasus झाला जुना आता स्पायवेअर; पाळत ठेवण्यासाठी, हाय-प्रोफाइल लोकांची हेरगिरी करण्यासाठी वापरले जात आहे स्पायवेअर!
29 फोनच्या तपासणीमध्ये पेगासस स्पायवेअरचा ठोस पुरावा नाही, चौकशीत केंद्राचे असहकार्यImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 11:06 PM

नवी दिल्ली : पेगासस हा शब्द जरी कानावर आला तरी अनेकांना मध्यंतरीचा देशात उचल खालेल्या एक प्रकरण आठवते. ज्यात काँग्रेसकडून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हेरगिरीचा आरोप केला होता. त्यामुळे पेगासस स्पायवेअरची (Pegasus Spyware) माहिती असणे आवश्यक आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने भारत सरकार लोकांची हेरगिरी करत असल्याचा दावा एका अहवालात ही करण्यात आला होता. यावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. तर हा गदारोळ ससंदेत ही पाहायला मिळाला. तर पेगाससवरून विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत होते. वर्तमानपत्रांच्या मुख्य मथळ्याही ‘पेगासस स्पायवेअर’ या शब्दांनी चमकत होत्या. हे प्रकरण अजून थंडावले नव्हते की आता एका नव्या स्पायवेअरने पुन्हा एकदा सरकारला गोत्यात आणले आहे. वास्तविक, सायबर सुरक्षा संशोधकांनी (Cyber Security Researcher) एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की सरकार आता पेगाससऐवजी हेरमिट (Hermit) नावाचे नवीन ‘स्पायवेअर’ वापरत आहेत.

हाय-प्रोफाइल लोकांना लक्ष्य करण्यासाठी वापरत

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, हर्मिट हा नवीन अँड्रॉइड स्पायवेअर आहे. हे सरकार हाय-प्रोफाइल लोकांना लक्ष्य करण्यासाठी वापरत आहे. या स्पायवेअरच्या माध्यमातून ज्या हाय-प्रोफाईल लोकांना लक्ष्य केले जात आहे. त्यात व्यावसायिक, अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, सरकारी अधिकारी इत्यादींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. एसएमएसद्वारे आपले लक्ष ठरवणाऱ्या प्रणालीवर स्थापित केलेला स्पायवेअर प्रथम कझाकस्तानमध्ये वापरण्यात आला. त्यानंतर तो सीरिया आणि इटलीमध्ये देखील वापराल गेला.

सायबर सिक्युरिटी कंपनी लुकआउट थ्रेट लॅबला आढळले की कझाकस्तान सरकार या वर्षी एप्रिलमध्ये स्पायवेअर हर्मिट वापरत आहे. संशोधकांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “विश्लेषणाच्या आधारे, हर्मिट स्पायवेअर इटालियन स्पायवेअर विक्रेता RCS लॅब आणि टेलिकम्युनिकेशन सोल्यूशन कंपनी “Tyklab SRL” यांनी विकसित केले आहे. संशोधकांनी सांगितले की, त्यांना शंका आहे की ही टेलिकम्युनिकेशन सोल्यूशन्स कंपनी फ्रंट कंपनी म्हणून काम करत आहे.

हे सुद्धा वाचा

इटालियन सरकारने वापरले आहे

त्यांच्या मते, हर्मिट पहिल्यांदाच वापरला जात नाही. यापूर्वी 2019 मध्ये, इटालियन सरकारने भ्रष्टाचारविरोधी मोहिमेसाठी याचा वापर केला होता. ईशान्य सीरियातील एका अज्ञात पक्षाने त्याचा वापर केल्याचे पुरावेही सापडल्याचे त्यांनी सांगितले. RCS लॅब तीस दशकांहून अधिक काळ सक्रिय आहे आणि पेगासस विकसक NSO ग्रुप आणि फिनफिशर डेव्हलपर गामा ग्रुपच्या मार्केटमध्ये कार्यरत आहे.

गुप्तचर संस्थांशी संबंध

RCS लॅबचे पाकिस्तान, चिली, मंगोलिया, बांगलादेश, व्हिएतनाम, म्यानमार आणि तुर्कमेनिस्तानच्या लष्करी आणि गुप्तचर संस्थांशी व्यावसायिक संबंध आहेत. या कंपन्यांचा दावा आहे की, ते त्यांची उत्पादने केवळ अशा ग्राहकांनाच विकतात ज्यांच्याकडे पाळत ठेवण्याचा कायदेशीर वापर आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, प्रत्यक्षात अशा स्पायवेअरचा वापर राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली व्यापारी, मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षण क्षेत्रातील लोक आणि सरकारी अधिकारी यांची हेरगिरी करण्यासाठी केला जातो.

असे कार्य करते हेरमिट

हर्मिट एक मॉड्यूलर स्पायवेअर आहे. जो एकदा डाउनलोड केल्यावर कार्य करण्यास सुरवात करतो. हे मॉड्युल्स हर्मिटला डिव्हाइसमध्ये प्रवेश करतो. हा ऑडिओ रेकॉर्ड करू शकतो, कॉल करू शकतो आणि तो पुनर्निर्देशित करू शकतो. हा कॉल लॉग, संपर्क, फोटो, डिव्हाइस स्थान आणि एसएमएस डेटा गोळा करू शकतो.

रिसर्च टीमच्या म्हणण्यानुसार या स्पायवेअरचा वापर एसएमएसच्या माध्यमातून केला जातो. असा आभास दिला जातो की, हा एसएमएस योग्य स्रोताकडून मिळत आहे. हे टेलिकॉम कंपन्या आणि स्मार्टफोन निर्मात्यांच्या अॅप्लिकेशन्सची कॉपी करतो.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.