गूगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिधाईंची एकूण मालमत्ता किती? आकडा पाहून विश्वास बसणार नाही!
सुंदर पिचाई यांचा प्रवास आणि कमाई ही मेहनत, बुद्धिमत्ता आणि संधी यांचा संगम आहे. त्यांची संपत्ती आणि पगार यामुळे ते जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सीईओंपैकी एक आहेत. तुम्हाला त्यांच्यासारखं यश हवं असेल, तर मेहनत आणि नावीन्याचा मार्ग स्वीकारावा लागेल.

गूगल हे नाव आज जगभरातलं सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून गणलं जात. काही सेकंदात हवी ती माहिती देणारं गूगल आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधतं. या प्रचंड यशस्वी कंपनीला आणि तिच्या मूळ कंपनी अल्फाबेटला सांभाळणारे व्यक्ती म्हणजे सुंदर पिचाई. भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले सुंदर पिचाई गूगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. त्यांची कमाई आणि संपत्ती इतकी प्रचंड आहे, की ती ऐकून कोणाचेही डोळे विस्फारतील. चला, सुंदर पिचाईंच्या कमाई आणि संपत्तीचा हा प्रवास जाणून घेऊया.
गूगल आणि अल्फाबेटच्या सीईओपदाचा प्रवास
सुंदर पिचाई यांचा जन्म 10 जून 1972 रोजी तमिळनाडूच्या मदुराईत झाला. त्यांनी आयआयटी खरगपूरमधून मेटलर्जिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीतून मटेरियल सायन्स अँड इंजिनीअरिंगमध्ये मास्टर्स आणि पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए पूर्ण केलं. 2004 मध्ये ते गूगलमध्ये रुजू झाले. त्यांनी गूगल क्रोम, क्रोम ओएस, गूगल ड्राइव्ह, जीमेल आणि गूगल मॅप्ससारख्या उत्पादनांचं नेतृत्व केलं. 10 ऑगस्ट 2015 रोजी त्यांना गूगलचा सीईओ बनवण्यात आलं. 2 ऑक्टोबर 2015 रोजी त्यांनी हे पद स्वीकारलं. डिसेंबर 2019 मध्ये त्यांना अल्फाबेटचंही सीईओपद देण्यात आलं.
सुंदर पिचाईंची कमाई
सुंदर पिचाई यांची कमाई प्रामुख्याने अल्फाबेटमधील पगार, बोनस, स्टॉक अवॉर्ड्स आणि इतर सुविधांमधून येते. 2022 मध्ये त्यांची एकूण कमाई 226 दशलक्ष डॉलर (सुमारे 1880 कोटी रुपये) होती. यात 2 दशलक्ष डॉलर (सुमारे 16.4 कोटी रुपये) बेसिक पगार आणि 218 दशलक्ष डॉलर (सुमारे 1810 कोटी रुपये) स्टॉक अवॉर्ड्सचा समावेश होता. याशिवाय, त्यांच्या सुरक्षेसाठी 6 दशलक्ष डॉलर (सुमारे 50 कोटी रुपये) खर्च झाले. 2019 मध्ये त्यांची कमाई तब्बल 281 दशलक्ष डॉलर (सुमारे 2145 कोटी रुपये) होती, ज्यात 277 दशलक्ष डॉलर स्टॉक अवॉर्ड्स होते. 2023 मध्ये त्यांचा पगार 8.8 दशलक्ष डॉलर होता, ज्यात स्टॉक अवॉर्ड्स नव्हते. त्यांना दर तीन वर्षांनी स्टॉक अवॉर्ड्स मिळतात. 2019 मध्ये त्यांना 240 दशलक्ष डॉलरचं स्टॉक पॅकेज मिळालं, ज्यापैकी 120 दशलक्ष डॉलर तिमाही हप्त्यांमध्ये दिले गेले. उरलेली रक्कम कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून होती. 2022 मध्ये त्यांना 63 दशलक्ष आणि 84 दशलक्ष डॉलरचे दोन परफॉर्मन्स स्टॉक युनिट्स मिळाले.
सुंदर पिचाईंची संपत्ती
सुंदर पिचाई यांची एकूण संपत्ती मे 2025 पर्यंत सुमारे 1.3 अब्ज डॉलर (सुमारे 10,810 कोटी रुपये) आहे. यात त्यांचे अल्फाबेटमधील 88,693 शेअर्स (सुमारे 496 दशलक्ष डॉलर) आणि 2004 पासून विकलेल्या शेअर्समधून मिळालेले सुमारे 1 अब्ज डॉलर यांचा समावेश आहे. गूगलच्या वाढत्या शेअर किमतीमुळे त्यांच्या मालमत्तेत सातत्याने वाढ होत आहे. ते लॉस अल्टोस हिल्स, कॅलिफोर्नियात 40 दशलक्ष डॉलरच्या (सुमारे 330 कोटी रुपये) आलिशान बंगल्यात राहतात. हा बंगला 4000 चौरस फुटांचा आहे आणि त्यात टेनिस कोर्ट, मिनी गोल्फ फील्डसारख्या सुविधा आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे भारतातही काही मालमत्ता आहेत. ते टेसला, कॅडिलॅक आणि गूगल टेस्टिंग कारसह सहा लक्झरी गाड्यांचे मालक आहेत.
का आहे इतकी प्रचंड कमाई?
सुंदर पिचाई यांच्या कमाईचं मुख्य कारण म्हणजे गूगल आणि अल्फाबेटचं यश. गूगलचं ब्रँड मूल्य सुमारे 1940 अब्ज डॉलर (सुमारे 144 लाख कोटी रुपये) आहे. पिचाई यांच्या नेतृत्वात गूगलने कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग आणि हार्डवेअर क्षेत्रात मोठी प्रगती केली. युट्यूब आणि अँड्रॉइडच्या वाढीला त्यांनी गती दिली. त्यांच्या धोरणांमुळे गूगलचा महसूल 2015 पासून दरवर्षी वाढतोय. त्यांना मिळणारे स्टॉक अवॉर्ड्स हे कंपनीच्या शेअर किमती आणि कामगिरीशी जोडलेले असतात. गूगलचे शेअर्स गेल्या दशकात सातत्याने वाढले, ज्यामुळे पिचाई यांच्या संपत्तीतही वाढ झाली. 2022 मध्ये अल्फाबेटच्या शेअर्समध्ये 39% घसरण झाली, तरी 2023 मध्ये 19.5% सुधारणा झाली, ज्याचा फायदा पिचाई यांना झाला.
