WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप DP कुणी बघावा हे तुम्ही ठरवा, लास्ट सीनमध्येही नवा बदल, जाणून घ्या…

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप DP कुणी बघावा हे तुम्ही ठरवा, लास्ट सीनमध्येही नवा बदल, जाणून घ्या...
व्हॉट्सअ‍ॅप DP कुणी बघावा हे तुम्ही ठरवा

आता तुमचा डीपी, लास्ट सीन आणि बायो तुम्ही ठरवलेले लोकंच बघू शकतात. जाणून घ्या....

शुभम कुलकर्णी

|

Jun 18, 2022 | 2:31 PM

नवी दिल्ली :  व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सातत्यानं अपडेट होत आहे. मागच्या काही महिन्यांपासून जर तुम्ही बघाल तर काही ना काही बदल सातत्यानं केले जात असल्याचं  दिसतंय. युझर्सची (User) गरज लक्षात घेऊन या गोष्टी अपडेट केल्या जात आहेत. या सोशल नेटवर्कीगच्या दुनियेत प्रत्येक कंपनीला मोठं बनायचं आहे. त्यामुळे प्रत्येक पर्याय व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक (Facebook) किंवा ट्विटर आपल्या Appमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतायत. यामध्ये अलिकडेच व्हॉट्सअ‍ॅपनं ऑनलाईन पेमेंटचा देखील पर्याय आणला आहे. त्यातच आता एक असं नवं फीचर आलं आहे. ज्यामुळे तुम्हाला डीपी, लास्ट सीन कुणी बघावं यावर बंधनं आणू शकतात. विशेष म्हणजे यावर तुम्ही ठरवू शकता, की कुणी तुमचा डीपी बघावा. तो ठरवलेल्या युझर्स व्यतीरिक्त इतर कुणालाही तुमचा व्हॉट्सअ‍ॅप डीपी दिसणार नाही. यामुळे या फिचर्सची सध्या चांगलीच चर्चा आहे.

काय आहे नवे फीचर?

WhatsAppनं आपल्या नव्या बदलावर बोलताना म्हटलंय की, ‘तुमच्या गोपनीयतेचं अधिक संरक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्या गोपनीयता नियंत्रण सेटिंग्जमध्ये नवीन पर्याय सादर करत आहोत. तुम्ही आता तुमच्या संपर्क सूचीमधून तुमच्या प्रोफाइलमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणता पर्याय निवडू शकता. फोटो, बायो पाहू शकता आणि शेवटचे पाहिलेले स्टेट्स म्हणजेच लास्ट सीन देखील पाहू शकतात. यापूर्वी वापरकर्त्यांकडे विशिष्ट लोकांचा लास्ट सीन किंवा प्रोफाइल फोटो लपवण्याचा कोणताही पर्याय नव्हता. पूर्वी WhatsApp वापरकर्त्यांकडे तीन पर्याय होते. याता यामध्ये एक नवा पर्याय आला असून कुणी लास्ट सीन, बायो आणि प्रोफाईन फोटो पहायचा हे तुम्ही ठरवू शकता.

हे सुद्धा वाचा

कसं वापरणार फीचर?

  1. Tap on Account यावर जावं लागणार
  2. त्यानंतर Tap Privacy यावर क्लिक करा
  3. Tap on Profile Picture यावर आल्यावर तुमच्या समोर नवा पर्याय येईल
  4. Tap on My Contacts Except…हा तुमचा नवा पर्याय असेल
  5. आता तुम्ही अशा लोकांना निवडा ज्यांना तुमचा डीपी तुम्ही दाखवू इच्छित नाही.
  6. आता उजव्या बाजूला असलेल्या डन यावर क्लिक करा
  7. यानंतर तुमचा डीपी तुम्ही सिलेक्ट केलेल्या लोकांना दिसणार नाही.

यामध्ये एक लक्षात घेण्यासारखं आहे की अलीकडेच असे अहवाल आले होते की व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलसाठी नवीन फीचर्सवर काम करत आहे. अ‍ॅप आता वापरकर्त्यांना कॉलवर विशिष्ट लोकांना म्यूट करण्याचा पर्याय देईल. मात्र, म्यूटचे अधिकार अ‍ॅडमिनकडे असतील की सर्व वापरकर्त्यांकडे असतील याबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. त्याचप्रमाणे यूजर्स कॉल दरम्यान खास लोकांना मॅसेज देखील करू शकतील.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें