AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Infinix चा पहिला Future Ready 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

भारत 5जी तंत्रज्ञान व नेटवर्क लाँच करण्याच्या समीप पोहोचत असताना इन्फिनिक्स (Infinix) या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने भारतीय बाजारपेठेमध्ये त्यांचा पहिला 5जी स्मार्टफोन झीरो 5जी (Infinix ZERO 5G) लाँच केला आहे.

Infinix चा पहिला Future Ready 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Infinix Future Ready 5G samartphome ZERO 5G Image Credit source: Infinix
| Updated on: Apr 01, 2022 | 2:54 PM
Share

मुंबई : भारत 5जी तंत्रज्ञान (5G Technology) व नेटवर्क लाँच करण्याच्या समीप पोहोचत असताना इन्फिनिक्स (Infinix) या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने भारतीय बाजारपेठेमध्ये त्यांचा पहिला 5जी स्मार्टफोन झीरो 5जी (Infinix ZERO 5G) लाँच केला आहे. इन्फिनिक्सने झीरो 5जी च्या चाचणीसाठी रिलायन्स जिओसोबत सहयोग केला आहे आणि हाय परफॉर्मन्स स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन झीरो 5जी चांगली कार्यक्षमता असलेला फ्यूचर-रेडी 5जी फोन खरेदी करू पाहणाऱ्या युजर्ससाठी परिपूर्ण पॅकेज असेल. या स्मार्टफोनमध्ये 13 5जी बॅण्ड्स आहेत, जे आतापर्यंतच्या कोणत्‍याही स्मार्टफोनमधील बॅण्ड्सच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. हाय क्लास फीचर्स असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 11,999 रूपये आहे.

हा स्मार्टफोन 18 एप्रिलपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. युजर्स 100 रूपयांच्या अतिरिक्त शुल्कामध्ये डिवाईसवर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या नुकतेच लाँच केलेल्या फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्रोग्रामचा देखील लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत ते एमओपी मूल्याच्या फक्त 70 टक्‍के रक्‍कम भरत झीरो 5जी खरेदी करू शकतात. डिवाईस एक वर्ष वापरल्यानंतर ग्राहक उर्वरित 30 टक्‍के रक्‍कम भरून स्मार्टफोन कायम ठेवू शकतात किंवा फ्लिपकार्टला परत करू शकतात. याव्‍यतिरिक्त ग्राहक 6, 9 व 12 महिन्यांसाठी नो कॉस्‍ट ईएमआय पर्यायाचा देखील लाभ घेऊ शकतात.

हाय क्लास फीचर्ससह सुसज्ज प्रिमिअम व ट्रेण्डी डिझाइन डिवाईस आधुनिक प्रोसेसर, विस्तारित करता येऊ शकणारी 8 जीबी + 5 जीबी रॅम, 128 जीबी रॉम, मोठ्या बॅटरीसह सुपरफास्ट चार्जिंग आणि अॅडव्हान्स्ड कॅमेरा असे सर्वोत्तम फीचर्स असलेला या सेगमेंटमधील पहिलं डिव्हाईस असेल. ज्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम स्मार्टफोनचा एक्सपीरियन्स मिळेल. हे डिव्हाईस दोन आकर्षक रंगांमध्ये येईल, ज्यामध्ये स्कायलाइट ऑरेंजसह वेजन लेदर बॅक पॅनेल व कॉस्मिक ब्लॅक यांचा समावेश आहे.

हाय परफॉर्मन्स

नवीन झीरो 5जी मध्ये उच्चस्तरीय फर्स्ट-इन-सेगमेंट मीडियाटेक डायमेन्सिटी 900 प्रोसेसर आहे. यामध्ये अधिक मल्टी-टास्कर ग्राहकांना कार्यक्षम शक्ती व बॅटरी क्षमतेच्या खात्रीसाठी 6-नॅनोमीटर प्रोसेसर आहे. झीरो 5जी आधुनिक एलपीडीडीआर5 रॅम तंत्रज्ञान व अल्ट्रा-फास्ट (यूएफएस) 3.1 स्टोरेज असलेला इन्फिनिक्सचा पहिला स्मार्टफोन देखील आहे. यामुळे विविध अॅप्सदरम्यान मोठ्या फाइल्स स्टोअर व ट्रान्सफर करता येतात आणि अत्यंत जलद गतींमध्ये विनाव्यत्यय गेमिंगचा आनंद घेता येतो.

Infinix ZERO 5G चे स्पेसिफिकेशन्स

आधुनिक अँड्रॉईड 11 वर संचालित झीरो 5 जी मेमफ्यूजनच्या माध्‍यमातून 13 जीबी पर्यंत वाढवता येणा-या रॅमद्वारे युजर्सना विनाव्यत्यय कन्टेन्ट पाहण्याचा आनंद देतो. 8 जीबी/128 जीबी व्हेरिएण्ट इंटर्नल स्टोरेजमध्ये 5 जीबी एक्स्टर्नल मेमरीची भर करतो आणि विद्यमान रॅम क्षमतेमध्ये वाढ करत कोणत्‍याही अडथळ्याशिवाय विविध अॅप्सदरम्यान एकसंधी शिफ्टची खात्री देतो.

अल्ट्रा-स्मूद डिस्प्ले व डिझाइन

इन्फिनिक्सचा नवीन डिवाईस फर्स्ट-इन-सेगमेंट युनि-कर्व्ह स्टाइल पॅनेलमध्ये डिझाइन करण्यात आला आहे. कॅमेरा मॉड्यूलचा आकर्षक ग्रेडिएण्ट आर्क कॅमेरा सिंगल-शीट रिअर पॅनेलला एकसमान फ्लूईड कर्व्हसह संतुलित करतो, ज्यामधून युजर्सच्या स्वत:च्या स्टाइलला पूरक असे फोनचे स्लीक कॉन्चर्स मिळतात. झीरो 5जी मध्ये 6.78 इंच एफएचडी+ एलटीपीएस आयपीएस डिस्प्लेसह व्यापक 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट व 240 हर्टझ टच सॅम्प्लिंग रेट आहे, जे युजर्सच्या बोटांना अत्यंत सुलभपणे इंटरअॅक्शन करण्याची खात्री देते.

शानदार कॅमेरा

झीरो 5जी किफायतशीर दरामध्ये दर्जात्मक कॅमेरा देण्यासंदर्भातील इन्फिनिक्सच्या वारसाला पुढे घेऊन जातो. या डिवाईसमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा लेन्स, 13 मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्स, 2 मेगापिक्सल डेप्थ लेन्स व क्वॉड-एलईडी फ्लॅशलाइट्स आहे. कॅमेरा विभागातील 13 मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्समध्ये २एक्स ऑप्टिकल झूम व 30 एक्स डिजिटल झूम आहे, जे कोणत्याही स्थितीमध्ये दूरच्या वस्तूंना सुस्पष्टपणे कॅप्चर करू शकते.

मोठी बॅटरी

झीरो 5 जी मध्ये 5000 एमएएच उच्च क्षमतेची बॅटरी आहे, जी दीर्घकाळापर्यंत अधिक वापरानंतर देखील स्मार्टफोन कार्यरत ठेवते. यामुळे युजर्स दीर्घकाळापर्यंत चित्रपट पाहू शकतात, गेम्स खेळू शकतात, संगीत ऐकण्याचा आणि आवडते मनोरंजन पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.