20, 000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 16 जीबी रॅम असलेला गेमिंग स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या त्याचे फीचर्स
भारतात Infinix GT 30 5G+ स्मार्टफोन लाँच झाला आहे, हा फोन 144 Hz रिफ्रेश रेट, AMOLED डिस्प्ले, MediaTek प्रोसेसर, 5500mAh बॅटरी सारख्या वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आला आहे. या फोनसाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील आणि हा फोन कोणत्या दिवसापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल? चला जाणून घेऊयात.

इन्फिनिक्सने भारतीय बाजारात एक नवीन गेमिंग स्मार्टफोन Infinix GT 30 5G Plus लाँच केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी त्याचे प्रो व्हर्जन इन्फिनिक्स जीटी ३० प्रो लाँच केले. या गेमिंग स्मार्टफोनमध्ये Should Triggers दिले आहेत, ज्यामुळे गेमिंगचा अनुभव अनेक पटींनी चांगला होणार आहे. या इन्फिनिक्स स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तर आजच्या या लेखात आपण गेमिंग स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इन्फिनिक्स जीटी 30 5जी प्लस स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या इन्फिनिक्स स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा 1.5 के एमोलेड डिस्प्ले आहे जो 2160 हर्ट्झ इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट, 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर आणि 4500 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह येतो. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7आय वापरण्यात आला आहे.
चिपसेट: या हँडसेटमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 चिपसेट वापरण्यात आला आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: अँड्रॉइड 15वर आधारित हा नवीनतम फोन XOS 15वर काम करतो. कंपनी या फोनमध्ये दोन प्रमुख ओएस अपग्रेड आणि तीन वर्षांचे सुरक्षा अपडेट्स दिले आहेत.
खास वैशिष्ट्ये: हा फोन एआय नोट, Folax AI व्हॉइस असिस्टंट, AI रायटिंग असिस्टंट आणि AI गॅलरी इत्यादी Infinix AI फिचर्सने सुसज्ज करण्यात आले आहे. हा मिड-रेंज फोन गुगल सर्कल टू सर्च फीचरला देखील सपोर्ट करतो, याशिवाय फोनच्या मागील पॅनलवर 10 पेक्षा जास्त लाइटिंग पॅटर्नसह कस्टमाइझ करण्यायोग्य मेका लाइट एलईडी युनिट आहे.
कॅमेरा: या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, 64 मेगापिक्सेल सोनी IMX682 प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा सेन्सर आहे. समोर 13 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जे 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते, हा फोन 10W रिव्हर्स वायर्ड आणि बायपास चार्जिंग सपोर्टसह येतो.
कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये 5G, वाय-फाय, GPS, ब्लूटूथ 5.3 आणि USB टाइप-सी पोर्ट आहे, इतकेच नाही तर हा फोन इन्फिनिक्सच्या अल्ट्रालिंक तंत्रज्ञानाला देखील सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी, या हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील समाविष्ट करण्यात आला आहे.
इन्फिनिक्स जीटी ३० ५जी प्लसची भारतातील किंमत
या Infinix स्मार्टफोनच्या 8 जीबी / 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,499 रुपये आहे. त्याच बरोबर या हँडसेटचा 8 जीबी / 256 जीबी असलेला टॉप व्हेरिएंट किंमत 20,999 रुपये आहे. तर या फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर, या फोनची विक्री 14 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल. तसेच आयसीआयसीआय बँक कार्ड असलेल्या इन्फिनिक्स जीटी ३० स्मार्टफोनवर १५०० रुपयांची सूट उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनच्या स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, या किंमतीच्या रेंजमध्ये हा फोन Poco X7 5G, Realme P3 Pro 5G, Vivo T3 5G सारख्या स्मार्टफोनना कडक स्पर्धा देईल.
