AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्सनल फोटो चोरणारे ‘हे’ अॅप मोबाईलमधून तात्काळ डिलीट करा

मुंबई : आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे कॅमेरा अॅप असतात. मात्र हे कॅमेरा अॅप आपल्यासाठी धोकादायक असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे. ट्रेंड मायक्रोच्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, बहुतेक कॅमेरा अॅप्स हे युझरला पॉर्नोग्राफिक कटेंट पाठवतात. त्यानंतर युझरचा फोटो मिळवण्यासाठी त्याला फिशिंग वेबसाईटवर घेऊन जातात. या प्रकारचे अॅप युझरच्या मोबाईलमध्ये अटॅक […]

पर्सनल फोटो चोरणारे 'हे' अॅप मोबाईलमधून तात्काळ डिलीट करा
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

मुंबई : आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे कॅमेरा अॅप असतात. मात्र हे कॅमेरा अॅप आपल्यासाठी धोकादायक असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे. ट्रेंड मायक्रोच्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, बहुतेक कॅमेरा अॅप्स हे युझरला पॉर्नोग्राफिक कटेंट पाठवतात. त्यानंतर युझरचा फोटो मिळवण्यासाठी त्याला फिशिंग वेबसाईटवर घेऊन जातात. या प्रकारचे अॅप युझरच्या मोबाईलमध्ये अटॅक करण्यासाठी रिमोट अॅड कॉन्फिग्युरेशन सर्व्हरपर्यंत जाण्यासही सक्षम असतात. यापैकी अनेक ब्युटी कॅमेरा अॅप हे लाखाहून अधिकवेळा डाऊनलोड करण्यात आले आहेत. पण या अॅप्सने युझरच्या फोटोंमध्ये ढवळाढवळ केल्याचं समोर आलं आहे.

ट्रेंड मायक्रोने अशा प्रकारच्या 29 ब्युटी कॅमेऱ्यांना शोधून काढलं आहे. भारतासह जगभरातील अँड्रॉईड युझर्सवर याचा विपरित परिणाम होत आहे. हे अॅप त्या इतर एडिटिंग अॅप प्रमाणेच दिसतात, जे सेल्फीला आणखी चांगलं बनवण्यासाठी तयार केले जातात. पण मोबाईच्या आत हे अॅप तुमच्या व्यक्तीगत गोष्टींसोबत ढवळाढवळ करत असतात, तेही आपल्या नकळत.

ट्रेंड मायक्रोच्या यादीत Pro Camera Beauty, Cartoon Art Photo, Beauty Camera, Selfie Camera Pro आणि Horizon Beauty Camera  यांसारखे 29 अॅप आहेत.

या 29 अॅप्सपैकी काही फोटो फिल्टर अॅपदेखील आहेत. जेव्हा आपण या फोटो फिल्टर अॅपचा वापर करुन ते फोटो अपलोड करतो तेव्हा हे अॅप आपले फोटो चोरतात. 29 अॅप्सपैकी 11 अॅप हे एक लाखाहून जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आले आहेत. तर तीन अॅप हे 10 लाखाहून जास्त डाऊनलोड करण्यात आले आहेत.

या अॅप्लिकेशनच्या संशयास्पद घडामोडीसमोर आल्यानंतर गुगलने यांना प्ले स्टोरवरुन काढून टाकले आहे. जर तुमच्याही मोबाईलमध्ये अशाप्रकारचे कुठले अॅप्लिकेशन असेल तर तात्काळ डिलीट करा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.