iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Max लाँच, भारतातील किंमत तब्बल…

गेल्या महिन्याभरापासून Apple च्या iPhone 11 चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते (iPhone 11 series launched). आता अखेर iPhone 11 सिरीज लाँच झाली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मोबाईल कंपनी Apple ने मंगळवारी कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टिनो येथे एका इव्हेंटदरम्यान iPhone 11 सीरिज लाँच केली.

iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Max लाँच, भारतातील किंमत तब्बल...
Nupur Chilkulwar

|

Sep 11, 2019 | 8:55 AM

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून Apple च्या iPhone 11 चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते (iPhone 11 series launched). आता अखेर iPhone 11 सीरिज लाँच झाली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मोबाईल कंपनी Apple ने मंगळवारी (10 सप्टेंबर) कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टिनो येथे एका इव्हेंटदरम्यान iPhone 11 सीरिज लाँच केली. या सीरिजदरम्यान, कंपनीने iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Max हे नवे iPhone लाँच केले (iPhone 11 series prices).

iPhone 11 सीरिजची भारतातील किंमत

iPhone 11 ची भारतातील किंमत 64,900 रुपये आहे. ही किंमत 64GB व्हेरिएंटसाठी आहे. तर iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये 128GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आली आहे. iPhone 11 Pro ची किंमत 99,900 रुपये आहे, तर याच्या Max व्हेरिएंटची किंमत 1,09,900 रुपये इतकी आहे. भारतात या नवीन iPhone साठी 13 सप्टेंबरपासून प्री बुकिंग सुरु होणार आहे. तर 20 सप्टेंबरपासून त्याची डिलीव्हरी सुरु होईल.

iPhone 11 सीरिजमध्ये खास काय?

या तीनही iPhone मध्ये फरक म्हणजे, iPhone 11 मध्ये तुम्हाला दोन कॅमेरे मिळतात(iPhone 11 series spesifications), तर iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये तीन रिअर कॅमेरे मिळतील. iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मधील फरक म्हणजे, Max ची स्क्रिन ही Pro च्या तुलनेत मोठी आहे.

या तीनही iPhone मध्ये Apple चा नवा चिपसेट Apple A13 Bionic लावण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे हा आतापर्यंतचा सर्वात फास्ट आणि चांगला iPhone असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

iPhone 11 चे स्पेसिफिकेशन्स

 • iPhone 11 हा  ब्लॅक (काळा), व्हाईट (पांढरा), लॅवेंडर, रेड (लाल), ग्रीन (हिरवा) आणि येलो (पिवळा) इत्यादी कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
 • iPhone 11 मध्ये 6.1 इंचाचा LCD IPS HD डिस्प्ले देण्यात आला आहे.
 • या फोनमध्ये A13 बायोनिक प्रोसेसर आहे.
 • iPhone 11 फास्ट फेस आईडीला सपोर्ट करतो.
 • iPhone XR च्या तुलनेत iPhone 11 ची बॅटरी एक तास जास्त चालेल, असा दावा Apple ने केला आहे.
 • हा फोन 30 मिनटांपर्यंत 2 मीटरपर्यंत वॉटर रेजिस्टेंट आहे.
 • iPhone 11 च्या फ्रंटमध्ये 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर याच्या बॅकमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅकमध्ये 12-12 मेगापिक्सलचे दोन कॅमरे देण्यात आले आहेत.

iPhone 11 Pro आणि iPhone Pro Max चे स्पेसिफिकेशन्स

 • हे दोन्ही स्मार्टफोन सर्जिकल ग्रेड स्टेनलेस स्टीलने बनलेले आहेत.
 • iPhone 11 Pro आणि iPhone Pro Max मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे.
 • iPhone 11 Pro मध्ये 5.8 इंचाचा आणि iPhone 11 Pro Max मध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
 • iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मिडनाईट ग्रीन (हिरवा), स्पेस ग्रे (राखडी), सिल्वर/व्हाईट (पांढरा) आणि गोल्ड (सोनेरी) या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहेत.
 • या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. फोनच्या बॅकमध्ये 12-12 मेगापिक्सलचे तीन 3 कॅमरे असतील. यामध्ये पहिला 12 मेगापिक्सलचा वाईड कॅमेरा, दुसरा 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आणि तिसरा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड फोटोग्राफी लेन्स असेल.
 • या दोन्ही स्मार्टफोनमध्ये A13 बायोनिक चिपसेट आहे.
 • iPhone 11 Pro मध्ये iPhone XS च्या तुलनेत 4 तासाची एक्स्ट्रा बॅटरी लाईफ असेल. तर iPhone 11 Pro Max मध्ये iPhone XS Max च्या तुलनेत 5 तासाची एक्स्ट्रा बॅटरी लाईफ असेल.

Apple TV+ लवकरच येणार

Apple ने iPhone 11 लॉन्च इव्हेंटदरम्यान Apple TV+ ची घोषणाही केली. यामध्ये ओरिजिनल व्हिडीओ सब्सक्रिप्शन सर्विस मिळेल. 1 नोव्हेंबरपासून 100 देशांमध्ये याची सुरुवात होईल. Apple TV अॅपवर तुम्ही याला पाहू शकाल. त्याशिवाय, आयपॅड, आयपॉड टच आणि Apple टीव्हीमध्येही तुम्ही हे पाहू शकाल.

Apple Watch Series 5 लाँच

या इव्हेंटमध्ये iPhone सोबतच Apple Watch Series 5 लाँच करण्यात आली. भारतात याची किंमत 40,900 रुपयांपासून सुरु होईल.

संबंधित बातम्या :

Reliance Jio GigaFiber : तब्बल 100Mbps स्पीड, ऑफर, प्लान आणि सर्वकाही

Honor चा नवा रेकॉर्ड, एका महिन्यात 9X सीरिजच्या 30 लाख स्मार्टफोनची विक्री

Google Play Store मधून ‘हे’ अॅप हटवलं, लाखो युजर्सवर मालवेअर अटॅक

Nokia : या दोन फोनच्या किमतीत भरघोस कपात

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें