Jio ने पुन्हा आणली फ्री ऑफर, मोफत वापरता येणार सुपरफास्ट नेट
JIO Free Offer : जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना मोफत इंटरनेट वापरता येणार आहे. जिओची ही ऑफऱ काय आहे. कसा मिळणार यामध्ये तुम्हाला फायदा जाणून घ्या.

- दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवताच करोडो ग्राहक जमवणाऱ्या जिओने आता आपल्या युजर्ससाठी आणखी एक खुशखबर आणली आहे. कंपनी वेळोवेळी अनेक नियम बदलत असते. आता जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लान आणण्याच्या तयारीत आहे.
- ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांना आयपीएल 2024 पाहायचे आहे. Jio IPL ऑफर 2024 बद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या आयपीएल सीझनमध्ये आकाश अंबानीचा जिओ ५० दिवसांसाठी मोफत ब्रॉडबँड सेवा योजना देत आहे.
- जिओ फायबर आणि जिओ एअर फायबर ग्राहकांसाठी हा नवीन प्लान असणार आहे. ही ऑफर Jio True 5G मोबाईल कनेक्शनवर उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहक बिलिंग प्लान देखील बदलू शकतात. तुम्ही प्रीपेड, पोस्टपेड किंवा 12 महिने ॲडव्हान्स पेमेंट केले तरीही ही ऑफर तुम्हाला दिली जात आहे.
- तुम्ही ते सहजपणे कनेक्ट करू शकता आणि ते ५० दिवसांच्या मोफत व्हाउचरसह घरपोच सेवा घेऊ शकता. हे व्हाउचर ब्रॉडबँड इंस्टॉल केल्यानंतर ७ दिवसांच्या आत जमा केले जाईल.
- ग्राहक ५० दिवसांचे डिस्काउंट व्हाउचर सहज मिळवू शकतात. हे आगामी बिलिंग सायकलमध्ये देखील समायोजित केले जाऊ शकते. डिस्काउंट व्हाउचर 2 वर्षांसाठी वैध आहे.
- हा प्लान फक्त 30 एप्रिल 2024 पर्यंत वैध आहे. ५० दिवस मोफत मिळणे म्हणजे Jio ने पुन्हा एकदा डिस्काउंट ऑफरमध्ये प्रवेश केला आहे.






