Jio, Airtel की Vi, कोणत्या कंपनीचा दैनिक 2GB डेटा पॅक सर्वात स्वस्त? वाचा…
Best Recharge Plan: भारतात Jio, Airtel आणि Vi या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा रंगली आहे. कोणत्या कंपनीचा दैनिक 2 GB डेटा प्लॅन सर्वात स्वस्त आहे ते जाणून घेऊयात.

भारतात Jio, Airtel आणि Vi या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा रंगली आहे. खासकरून दैनिक 2 GB डेटा प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्शित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सेगमेंटमध्ये तिन्ही कंपन्यांनी आपापले प्लॅन लॉन्च केले आहेत. आज आपण या तिन्ही पैकी कोणत्या कंपनीचा डेटा प्लॅन सर्वात स्वस्त आणि फायदेशीर आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.
जिओचा दैनिक 2 जीबी डेटा प्लॅन
जिओचा दैनिक 2 जीबी डेटा असणारा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 899 रूपयांत मिळत आहे. याची वैधता 90 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी 4 जी डेटा, अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. हा प्लॅन वापरकर्त्यांना ट्रू 5 जी आणि जिओहॉटस्टारचे 3 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देतो. तसेच गुगल जेमिनी प्रो वर 18 महिन्यांचा एक्सिस देखील देत आहे. त्यामुळे याकडे ग्राहक आकर्षित होत असल्याचे दिसत आहेत.
एअरटेलचा 2 जीबी डेटा प्लॅन
एअरटेलचा 2 जीबी डेटा प्लॅन 979 रुपयांना मिळतो. यात 84 दिवसांची वैधता मिळते. यात दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड 5 जी इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम आणि पर्प्लेक्सिटी प्रो चे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. तुम्ही ओटीटी आणि एआय टूल्स वापरत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.
व्ही चा 2 जीबी डेटा प्लॅन
व्ही दैनिक 2 जीबी डेटा असलेला प्लॅन 996 रूपयांना मिळतो, या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. यात 2 जीबी दैनिक डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये अमेझॉन प्राइम लाइटचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन, ज्याची किंमत 799 रुपये आहे ते मिळते. किंमत आणि वैधतेच्या बाबतीत हा प्लॅन जिओ आणि एअरटेलपेक्षा थोडा महाग वाटत आहे, तसेच काही यूजर्सना नेटवर्कबाबतही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
कोणत्या कंपनीचा प्लॅन बेस्ट?
प्राईज टू व्हॅल्यूच्या बाबतीत जिओचा प्लॅन सर्वात परवडणारा आहे. यात कमी किमतीत जास्त वैधता, 5जी सपोर्ट आणि एआय सबस्क्रिप्शनसह ओटीटी अॅक्सेस मिळतो, ही डील फायदेशीर आहे. जे लोक ओटीटी पाहतात त्यांच्यासाठी एअरटेल हाही चांगला पर्याय आहे. Vi च्या प्लॅनमध्ये OTT चे फायदे मिळतात मात्र किंमतीच्या बाबतीत हा थोडा महाग आहे.
