30 दिवसांसाठी जिओचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, मिळतील हे उत्तम लाभ
जिओचा 30 दिवसांच्या वैधतेचा हा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन आहे. तर रिलायन्स जिओच्या या वैधतेच्या सर्वात महागड्या प्लॅनमध्ये कोणते लाभ मिळतात हे जाणून घेऊयात.

रिलायन्स जिओ त्यांच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स तयार करत असतात. जेणेकरून प्रत्येकाला फायदा होईल. याबरोबरच जिओ त्यांच्या कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमुळे चर्चेत असतो. कारण देशात या कंपनीचा मोबाईल ग्राहकवर्ग सर्वात मोठा आहे. तर जिओ कंपनी त्यांच्याकडील 30 दिवसांच्या वैधतेच्या सर्वात महागड्या रिचार्ज प्लॅन देखील ग्राहकांना ऑफर करतो. तर आजच्या लेखात आपण जिओच्या अशा एका प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या 30 दिवसांच्या प्लॅनची किंमत एक हजार रूपयांपेक्षा जास्त आहे. चला तर मग जाणून घेऊया की तो कोणता प्लॅन आहे आणि या प्लॅनमधील कोणते खास ऑफर्स आहेत.
रिलायन्स जिओच्या 30 दिवसाच्या सर्वात महागड्या रिचार्ज प्लॅनची किंमत 1हजार 549 रूपये आहे. तर हा कंपनीचा पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये कंपनीकडून डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटी लाभांसह अनेक फायदे मिळतात.
रिलायन्स जिओ पोस्टपेड प्लॅन: 1 हजार 549 रूपयांच्या या रिचार्जमध्ये हे फायदे मिळतील
रिलायन्स जिओच्या 1 हजार 549 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये 300 जीबी 4जी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5जी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये 500 जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा देखील आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 300 जीबी डेटानंतर कंपनी प्रति जीबी १० रुपये आकारेल.
OTT लाभांच्या बाबतीत बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये तीन महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल आणि टीव्हीचा ॲक्सेस मिळतो. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये 50 जीबी जिओ क्लाउड स्टोरेज 35,100 किमतीचे गूगल जेमिनी एआय प्रो सबस्क्रिप्शन, नेटफ्लिक्स मोबाईल आणि ॲमेझॉन प्राईम लाईट यांचाही समावेश आहे. जर तुम्ही अमेरिका किंवा युएईमध्ये असाल तर आंतरराष्ट्रीय रोमिंगचे लाभही उपलब्ध आहेत. 30 दिवसांच्या वैधतेसह हा सध्या जिओचा सर्वात महागडा प्लॅन आहे.
येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की पोस्टपेड प्लॅन खरेदी करण्यावर 18% जीएसटी देखील आकारला जातो, म्हणजेच 1 हजार 549 रुपयांच्या प्लॅनसाठी 18 % जीएसटीनंतर तुम्हाला 1 हजार 827.82 रुपये मोजावे लागतील.
