AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

200 पेक्षा कमी किमतीत अमर्यादित 5 जी ॲक्सेस देत आहे जिओचा ‘हा’ नवा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगचा घेऊ शकता आनंद

तुमच्याकडे रिलायन्स जिओ सिम असेल, तर जिओचा हा नवीन रिचार्ज प्लॅन तुम्हाला माहित असायला हवा. 200 रूपयांपेक्षा कमी किमतीचा हा प्लॅन तुम्हाला अमर्यादित 5 जी ॲक्सेस देत आहे. चला तर मग या प्लॅनबद्दल अधिक जाणून घेऊयात...

200 पेक्षा कमी किमतीत अमर्यादित 5 जी ॲक्सेस देत आहे जिओचा 'हा' नवा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगचा घेऊ शकता आनंद
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Nov 01, 2025 | 6:34 PM
Share

आपल्या भारतात मोठमोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. त्यात सर्वात प्रसिद्ध रिलायन्स जिओ ही टेलिकॉम कंपनी आहे. जी त्यांच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत व सर्वसामान्य लोकांनाही कमी किमतीत रिचार्ज प्लॅनचा फायदा घेता यावा यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असतात. तर रिलायन्स जिओ प्रीपेड वापरकर्त्यांसाठी अनेक परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅन ऑफर करते. तर रिलायन्स जिओ कंपनीने 200 पेक्षा कमी किमतीत अमर्यादित 5G डेटा असलेला प्लॅन लाँच केला आहे. कंपनी 198 रूपयांमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह काही अतिरिक्त फायदे देखील देते. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात की मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी 198 रूपयांचा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला कोणते फायदे देईल आणि तुम्हाला किती दिवसांची वैधता मिळेल ते जाणून घेऊयात?

रिलायन्स जिओ 198 रूपयांचा प्लॅनची ​​माहिती

198 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनीकडून दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल. जर तुम्ही 5 जी सेवा असलेल्या क्षेत्रात राहत असाल आणि तुमचा फोन देखील 5 जीला सपोर्ट करत असेल, तर तुम्ही अमर्यादित 5जी सेवा असलेल्या या प्लॅनचा लाभ घेऊ शकता. याव्यतिरिक्त कंपनी या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस (लोकल आणि एसटीडी) देते. या प्लॅनमध्ये केवळ रोजचा डेटाच नाही तर दररोज 100 एसएमएस देखील समाविष्ट आहेत.

रिलायन्स जिओ 198 प्लॅनची ​​वैधता

198 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची नाही तर 14 दिवसांची वैधता मिळेल. दररोज 2 जीबी डेटासह, तुम्हाला 198 रुपयांमध्ये 14 दिवसांसाठी अंदाजे 28 जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल.

अतिरिक्त फायदे

198 रुपये खर्च केल्यानंतर तुम्हाला दररोज डेटा, एसएमएस आणि कॉलिंगचा फायदाच मिळणार नाही तर कंपनी तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचा मोफत अॅक्सेस देखील देईल.

एअरटेल 199 चा प्लॅन

एअरटेलकडे 198 रुपयांचा प्लॅन नाही, पण तो 199 रुपयांचा प्लॅन देतो. तथापि या प्लॅनमध्ये अमर्यादित 5 जी अॅक्सेस मिळत नाही. 28 दिवसांच्या वैधतेसह एअरटेलचा हा प्रीपेड प्लॅन फक्त 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देतो. या प्लॅनमध्ये स्पॅम अलर्ट, मोफत हॅलोट्यून्स आणि पर्प्लेक्सिटी एआय देखील उपलब्ध आहेत.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.