AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेसबुकवरचा तुमचा डेटा लीक तर होत नाहीय ना… जाणून घ्या ‘या’ वेबसाईटच्या माध्यमातून

आपला डेटा लीक झाला आहे का, हे तपासण्यासाठी ‘Have i been pwned’ या नावाची एक वेबसाइट आहे. या वेबसाईटवर आपला ईमेल किंवा फोन नंबर नोंदवून तुम्ही तुमचा डेटा चोरीला गेला आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.

फेसबुकवरचा तुमचा डेटा लीक तर होत नाहीय ना... जाणून घ्या ‘या’ वेबसाईटच्या माध्यमातून
फेसबुकवरचा तुमचा डेटा लीक तर होत नाहीय ना... जाणून घ्या ‘या’ वेबसाईटच्या माध्यमातून
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 6:10 PM
Share

नवी दिल्ली : अलिकडच्या दिवसांत डेटा लीकशी (Data Leak) संबंधित अनेक बातम्या दररोज ऐकायला मिळताहेत. यामागील कारण काहीही असो, परंतु युजर्सच्या डेटा लीकची प्रकरणे सतत वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या डेटाबद्दल काळजी वाटणे खूप स्वाभाविक आहे. म्हणूनच आपला डेटा लीक झाला आहे की नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे. आपला डेटा लीक होत आहे का हे तपासण्यासाठी काही सोप्या पद्धती आम्ही तुम्हाला येथे सांगू इच्छितो. (Know if your data has been leaked through this website)

आपला डेटा लीक झाला आहे का, हे तपासण्यासाठी ‘Have i been pwned’ या नावाची एक वेबसाइट आहे. या वेबसाईटवर आपला ईमेल किंवा फोन नंबर नोंदवून तुम्ही तुमचा डेटा चोरीला गेला आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. पूर्वी युजर्स या प्लॅटफॉर्मवर केवळ ईमेल अ‍ॅड्रेसद्वारे डेटा लीकचा शोध घेऊ शकत होते. आता आपला मोबाइल नंबरदेखील या वेबसाइटच्या सर्च बॉक्समध्ये नोंदवावा लागतो. त्यानंतर आपला डेटा या लीक डेटाबेसमध्ये आहे की नाही याची वेबसाइटमार्फत पडताळणी केली जाते.

फेसबुक डेटा लीक

काही दिवसांपूर्वी एका बातमीने युजर्सची झोप उडवली होती. ती बातमी म्हणजे, 533 दशलक्ष फेसबुक खात्यांमधील वैयक्तिक डेटा विनामूल्य ऑनलाइन लीक झाल्याचा आरोप करण्यात आला होता. अंतर्गत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, लीक झालेल्या आकडेवारीत 106 देशांमधील 533 दशलक्षहून अधिक फेसबुक युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. यात अमेरिेकेतील 32 दशलक्षहून अधिक युजर्स, इंग्लंडमधील 11 दशलक्ष युजर्स आणि भारतातील 6 दशलक्ष युजर्सचा समावेश आहे.

कोट्यवधी भारतीय युजर्सचा डेटा लीक

काही दिवसांपूर्वी भारतात डेटा लीक झाल्याची एक मोठी बातमी समोर आली होती. ज्यामध्ये सुमारे 9.9 कोटी भारतीयांचा डेटा लीक झाला होता. हॅकर्सनी असा दावा केला की त्यांनी भारतातील 9.9 कोटी मोबीक्विक युजर्सचा डेट उडविला आहे. यात मोबाइल फोन नंबर, बँक खात्याचा तपशील, ई-मेल आणि क्रेडिट कार्ड क्रमांक आदी माहितीचा समावेश आहे.

आपला डेटा सुरक्षित कसा ठेवावा

डेटा सिक्युरिटी टीप्स (Data Security Tips:) : तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू इच्छित असाल तर यासाठी तुम्हाला या महत्त्वपूर्ण स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

1. तुम्हाला ‘स्ट्रॉंग पासवर्ड’ किंवा पासवर्ड मॅनेजरचा वापर करायला पाहिजे.

2. अतिरिक्त सुरक्षिततेसाठी तुम्ही दोन तथ्य सत्यापन अर्थात टू फॅक्ट व्हेरिफिकेशन सक्षम अर्थात इनेबल करू शकता.

3. आपण बायोमेट्रिक पासवर्ड वापरू शकता. (Know if your data has been leaked through this website)

इतर बातम्या

Video | लाल साडीत महिलेच्या कोलांट उड्या, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Health Care : फळे खाल्ल्यानंतर ‘या’ चुका करु नका, काय करायचं?; वाचा सविस्तर!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.