डिजिटल आधार: एकाच अ‍ॅपमध्ये पाच प्रोफाईल लिंक, दाखवा कधीही अन् कुठेही!

डिजिटल आधार:  एकाच अ‍ॅपमध्ये पाच प्रोफाईल लिंक, दाखवा कधीही अन् कुठेही!
डिजिटल आधार: एकाच अ‍ॅपमध्ये पाच प्रोफाईल लिंक

आधार कार्डची व्हर्च्युअल कॉपी मोबाईल फोन मध्ये सेव्ह करता येऊ शकते. ज्या अ‍ॅपमध्ये व्हर्च्युअल कॉपी ठेवण्याची सुविधा आहे. त्यामध्ये केवळ स्वत:चे आधार बाळगण्याची मुभा असते. मात्र, UIDAI च्या mAadhaar अ‍ॅपमध्ये कुटूंबाच्या सदस्यांसहित किमान 5 जणांचे प्रोफाईल सेव्ह करता येतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 08, 2022 | 12:03 AM

नवी दिल्ली : नवजात बालक ते शंभरीपार ज्येष्ठ सर्वांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) महत्वाचे कागदपत्र ठरते. भारताच्या कानाकोपऱ्यात तुमची ओळख आणि पत्त्याची निश्चितीसाठी आधारशिवाय पर्याय नाही. सर्वत्र उपयुक्त ठरणारे आधार व्यतिरिक्त अन्य दुसरे कोणतेही कागदपत्रं नाही. केवळ ओळखीच्या सुनिश्चितीसाठी व पत्त्यासाठीच (Identity & Address Proof) नव्हे तर अन्य सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार उपयुक्त ठरते.

आधारचे महत्व आणि वापराच्या वाढत्या आवश्यकतेमुळे UIDAI द्वारे mAadhaar अ‍ॅप ची निर्मिती करण्यात आली आहे. तुम्ही कमाल 5 प्रोफाईल लिंक करू शकतात आणि वेळेप्रसंगी आधारचा व्हर्च्युअल वापरही केला जाऊ शकतो.

अ‍ॅप वर पाच आधार प्रोफाईल लिंक

जगभरात डिजिटल व्यवहारांवर भर दिला जात आहे. डिजिटल अग्रेसर राष्ट्रांत भारताचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. केंद्र सरकारने महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया मिशन हाती घेतले आहे.त्यामुळे शहर ते गाव पातळीपर्यंत महत्वाची कामं आॕनलाईन शक्य ठरली आहे. महत्वाच्या कामांसाठी आवश्यक ठरणारे आधार प्रत्येकवेळी हार्ड कॉपी स्वरुपात बाळगणे गरजेचे नाही. मतदान कार्ड, वाहन परवाना किंवा आधार सारखी महत्वाची कागदपत्रे व्हर्च्युअली बाळगता येतील.

आधार कार्डची व्हर्च्युअल कॉपी मोबाईल फोन मध्ये सेव्ह करता येऊ शकते. ज्या अ‍ॅपमध्ये व्हर्च्युअल कॉपी ठेवण्याची सुविधा आहे. त्यामध्ये केवळ स्वत:चे आधार बाळगण्याची मुभा असते. मात्र, UIDAI च्या mAadhaar अ‍ॅपमध्ये कुटूंबाच्या सदस्यांसहित किमान 5 जणांचे प्रोफाईल सेव्ह करता येतात.

तुमच्या डाटाची सर्वोत्तम सुरक्षा

mAadhaar मोबाइल अ‍ॅपवर एकूण पाच आधार प्रोफाईल लिंक करता येतात. mAadhaar अ‍ॅप मध्ये सेव्ह केलेल्या आधारला संपूर्ण देशात मान्यता आहे. तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मागणीनुसार अ‍ॅपमधील आधार दाखवता येईल. अ‍ॅपची सुरक्षेची एकाधिक वैशिष्ट्ये आहेत. तुम्हाला वापरताना प्रत्येकवेळी पासवर्ड टाकावा लागेल.

तुमची सर्व गोपनीय माहिती सुरक्षित राहू शकेल. तुमच्याशिवाय अन्य कोणीही व्यक्ती अ‍ॅपच्या सुरक्षित वैशिष्ट्यामुळे वापर करू शकणार नाही. mAadhaar अ‍ॅप सर्व अँड्रॉईड फोनसह आयफोन वर डाउनलोड केले जाऊ शकते. मात्र, तुमच्या आयफोन मध्ये iOS 10.0 किंवा त्यावरील सॉफ्टवेअर अ‍ॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे.

इतर बातम्या

फ्रान्सने गुगल आणि फेसबुकवर लावला कोट्यवधींचा दंड, जाणून घ्या त्यामागचे कारण

डिजिटल व्यवहार, ते ही विना इंटरनेट, कसं शक्य आहे? त्यासाठी वाचा ही महत्त्वाची माहिती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें