‘या’ टिप्सने फोनचा आवाज होईल इतका मोठा की Bluetooth स्पीकरही पडतील मागे!
स्मार्टफोनचा आवाज कमी वाटतोय? स्पीकर खरेदी करण्याऐवजी काही सोप्या ट्रिक्स वापरूनच फोनचा आवाज बुस्ट करता येतो! ‘या’ स्मार्ट टिप्स वापरल्या तर तुमचा फोन इतका जोरात बोलेल की Bluetooth स्पीकरही फिके वाटतील.

फोनच्या स्पीकरचा आवाज कमी झाला की लगेच टेन्शन येतं आणि फोन खराब झाला, असं वाटतं. पण घाबरण्याची गरज नाही. अनेकदा छोट्या कारणांमुळे आवाज कमी होतो. काही सोप्या पद्धतींनी तुम्ही घरबसल्या फोनचा आवाज पुन्हा व्यवस्थित करू शकता. सर्व्हिस सेंटरला जाण्याची गरज नाही. चला, जाणून घेऊया सहा प्रभावी टिप्स.
1. सर्वात आधी फोनचा व्हॉल्यूम नीट तपासा. कधीकधी चुकून व्हॉल्यूम कमी सेट झालेला असतो. फोनच्या व्हॉल्यूम बटणांनी किंवा सेटिंग्जमधून व्हॉल्यूम वाढवा. मीडियासाठी वेगळा आणि रिंगटोनसाठी वेगळा व्हॉल्यूम असतो, हेही तपासा.
2. फोन रीस्टार्ट केल्याने बॅकग्राऊंडमधील छोट्या तांत्रिक अडचणी सुटतात. अनेकदा बॅकग्राऊंड प्रोग्राम्समुळे आवाजावर परिणाम होतो. फोन बंद करून पुन्हा सुरू करा आणि आवाज तपासा.
3. ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोड चालू असेल, तर फोनचा आवाज कमी होऊ शकतो. सेटिंग्जमधून हा मोड बंद आहे, याची खात्री करा. काही फोनमध्ये हा मोड मीडियाच्या आवाजावरही परिणाम करतो.
4. ब्लूटूथ चालू असेल, तर फोनचा आवाज बाहेरच्या डिव्हाइसवर जातो. यामुळे स्पीकरचा आवाज कमी वाटतो. ब्लूटूथ बंद करा आणि पुन्हा आवाज तपासा. ब्लूटूथ हेडसेट किंवा स्पीकरशी कनेक्शन तपासा.
5. वरच्या पद्धतींनी फरक पडला नाही, तर गुगल प्ले स्टोअरवरून ‘व्हॉल्यूम बूस्टर’ अॅप डाउनलोड करा. अशी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. यामुळे स्पीकरचा आवाज वाढवता येतो. पण विश्वासार्ह अॅप निवडा आणि जास्त आवाजामुळे स्पीकर खराब होणार नाही, याची काळजी घ्या.
6. काहीही फरक पडला नाही, तर फॅक्टरी रीसेट हा शेवटचा पर्याय आहे. यामुळे फोनची सर्व माहिती डिलीट होऊन तो फॅक्टरी सेटिंग्जवर येतो. यापूर्वी फोटो, व्हिडिओ आणि महत्त्वाच्या फाइल्सचा बॅकअप घ्या. रीसेट केल्याने सॉफ्टवेअरमुळे येणाऱ्या अडचणी सुटू शकतात.
फोनचा स्पीकर वाचवण्यासाठी ५ सोपे पण प्रभावी उपाय:
1. स्पीकरमध्ये पाणी किंवा ओलसरपणा गेल्यास आवाज मफल होतो किंवा स्पीकर कायमचा खराब होतो. पावसात, स्वयंपाकघरात किंवा बाथरूममध्ये फोन नेणे टाळा.
2. पूर्ण व्हॉल्युमवर सतत म्युझिक किंवा कॉल ऐकल्यास स्पीकरचे डायक फ्रॅगमेंट्स खराब होऊ शकतात.
3. धूळमुळे स्पीकर ब्लॉक होतो. फोनला नेहमी कव्हर लावून ठेवा आणि नियमित साफसफाई करा.
4. खोटं आवाज येतो म्हणून सुई, पिन, टूथपिक वापरून स्पीकर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकतो.
5. अनेकदा साउंड इश्यूज हार्डवेअरमुळे नसून सॉफ्टवेअर गडबडीमुळे असतात. म्हणून OS अपडेट वेळेवर करा.