मार्क झुकरबर्गला मोठा झटका, टॉप 100 CEO च्या लिस्टमधून वगळलं, 2013 नंतर पहिल्यांदाच कामगिरीत घसरण

फेसबुकचे (Facebook) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांचा Glassdor च्या यंदाच्या टॉप 100 CEO च्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.

मार्क झुकरबर्गला मोठा झटका, टॉप 100 CEO च्या लिस्टमधून वगळलं, 2013 नंतर पहिल्यांदाच कामगिरीत घसरण
Mark Zuckerberg
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 5:42 PM

मुंबई : फेसबुकचे (Facebook) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांचा Glassdor च्या यंदाच्या टॉप 100 CEO च्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. 213 नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा झुकरबर्ग यांना Glassdor ने टॉप 100 सीईओंच्या यादीत स्थान दिलेलं नाही. (Mark Zuckerberg fails to appear on Glassdoor’s top 100 CEOs list due to poor ratings by employees)

Glassdor या जॉब सर्च साइटने एम्प्लॉई अप्रूव्हल रेटिंग्सच्या आधारावर वार्षिक CEO रॅन्किंग्सची लिस्ट (जागतिक) जारी केली आहे. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांच्या ग्लासडोरच्या सर्वेक्षणात मे 2020 ते मे 2021 या कालावधीत झुकरबर्गच्या अप्रूव्हलमध्ये 2019 मध्ये 94 टक्के आणि 2021 मध्ये 89 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार ग्लासडोरने 700 फेसबुक कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले. फेसबुकच्या 60 हजार कर्मचाऱ्यांपैकी हा एक छोटासा भाग आहे. ग्लासडोरला एक रिक्रूटमेंट टूल मानले जाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अप्रूव्हलला कंपनीच्या पेजवर स्पष्टपणे दर्शविले जाते.

मार्क झुकरबर्ग मागे का राहिले?

2013 मध्ये जेव्हा ग्लासडोरने ही यादी सुरू केली तेव्हा मार्क झुकरबर्ग 99 टक्के अप्रूव्हल स्कोरसह या यादीमध्ये सर्वात वरच्या स्थानी होते. 2020 च्या उत्तरार्धात आणि 2021 च्या सुरुवातीच्या काळात झुकरबर्ग यांच्या एम्प्लॉई अप्रूव्हलमध्ये घसरण झाली किंवा त्यांच्याकडून कर्मचार्‍यांच्या मंजुरी कमी झाल्या आहेत.

ब्लूमबर्गने अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या काळत दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे आणि COVID-19 आकडेवारीतील चुकांमुळे फेसबुक अनेक अडचणींचा सामना करत आहे. ही सोशल मीडिया या प्रकरणातून अद्याप सावरलेली नाही, किंवा त्याचा परिणाम अद्याप जाणवतोय.

झुकरबर्ग यांचं अप्रूव्हल रेटिंग अजूनही 73% च्या सरासरी सीईओ अप्रूव्हल रेटिंगपेक्षा जास्त आहे. या सरासरी सीईओ अप्रूव्हल रेटिंगच्या आकडेवारीची घोषणा करत ग्लासडोर ने 2021 ची लिस्ट जाहीर केली आहे.

नव्या IT नियमांनुसार फेसबुक अपडेट होणार

गुगल (Google) आणि फेसबुक (Facebook) सारख्या बड्या डिजिटल कंपन्यांनी भारतातील नवीन सोशल मीडिया नियमांनुसार (Social Media Rules) तक्रार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासह इतर माहिती सार्वजनिक करण्याच्या उद्देशाने आपली वेबसाइट अद्ययावत (अपडेट) करणे सुरू केले आहे.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या (WhatsApp) बड्या सोशल मीडिया कंपन्यांनी नवीन डिजिटल नियमांनुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे (आयटी) विविध तपशील शेअर केले आहेत. नवीन नियमांनुसार बड्या सोशल मीडिया मध्यस्थांना तक्रार निवारण अधिकारी, नोडल अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. या अधिकाऱ्यांची नियुक्ती भारतात होणे आवश्यक आहे आणि ते येथेच थांबून कामकाज सांभाळतील.

इतर बातम्या

Flipkart Sale : Narzo 30 Pro, Realme X7 आणि Moto चे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदीची संधी

धमाकेदार ऑफर! 14 हजारांचा 5G स्मार्टफोन 699 रुपयांत खरेदीची संधी

48MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 7999

(Mark Zuckerberg fails to appear on Glassdoor’s top 100 CEOs list due to poor ratings by employees)

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.