AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लिपकार्टवर मोटो जी37 आणि मोटो जी37 पॉवर सेल सुरू, मिळवा कार्ड डिस्काउंटचा लाभ

मोटोरोलाने नुकतेच मोटो जी37 आणि जी37 पॉवर हे स्मार्टफोन्स लाँच केले असून दोन्ही मॉडेल्स आज २५ मे पासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. हे बजेट-फ्रेंडली फोन्स आता तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये खरेदी करता येणार आहे. चला, आपण या डिस्काउंट्सबद्दल जाणून घेऊयात.

फ्लिपकार्टवर मोटो जी37 आणि मोटो जी37 पॉवर सेल सुरू, मिळवा कार्ड डिस्काउंटचा लाभ
Mobile
| Edited By: | Updated on: May 27, 2026 | 8:50 AM
Share

मोटोरोलाने गेल्या आठवड्यात जी-सिरीजमध्ये मोटो जी37आणि मोटो जी37 पॉवर हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आणि दोन्ही मॉडेल्स 25 मे पासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. दोन्ही फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर असून ते अँड्रॉइड 16 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात. हे स्मार्टफोन 10 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंतचे बजेट असलेल्या ग्राहकांना लक्ष्य करतात. तुम्ही बँक कार्ड डिस्काउंटचा लाभ देखील घेऊ शकता ज्यामुळे हे फोन्स आणखी स्वस्तात खरेदी करता येतात. चला तर मग आजच्या लेखात या नवीन स्मार्टफोनच्या ऑफर लाभांबद्दल जाणून घेऊयात.

G37 हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजच्या एकाच व्हेरिएंटमध्ये येतो, ज्याची किंमत 13 हजार 999 रूपये आहे. हा फोन Pantone Capri आणि Pantone Impenetrable या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

मोटो जी37 पॉवरची किंमत

हा फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज, आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. 4GB व्हेरिएंटची किंमत 15 हजार 999 रूपये आहे तर 8GB व्हेरिएंटची किंमत 18 हजार 999 रूपये आहे. हा फोन Pantone Nautical Blue, Pantone Impenetrable आणि Pantone Capri या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

फ्लिपकार्ट ऑफर माहिती

मोटो G37 खरेदी करताना तुम्हाला फ्लिपकार्ट ॲक्सिस किंवा फ्लिपकार्ट एसबीआय कार्डवर 700 रूपयांची सूट मिळू शकते. G37 पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास या फोनचा 8GB व्हेरिएंट या दोन्ही कार्डवर 950 रूपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे.

मोटो जी37 वैशिष्ट्ये

मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेटवर चालणाऱ्या या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.6-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे. यात 120Hz टच सॅम्पलिंग रेट, 1050 nits पर्यंतची पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 7i चे संरक्षण देखील आहे. 8-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह या फोनमध्ये मागील बाजूस 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2-इन-1 लाइट सेन्सर आहे. यात 5200mAh क्षमतेची बॅटरी आहे.

मोटो जी37 पॉवर स्पेसिफिकेशन्स

या हँडसेटमध्ये 120Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे. यात 1050 nits पर्यंतची पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 7i आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 प्रोसेसरवर चालणाऱ्या या हँडसेटमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 2-इन-1 लाइट सेन्सरसह 50-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. यात 7000mAh क्षमतेची बॅटरी देखील आहे.

Follow Us
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले
नागपूरकरांचा गौरव... देवाभाऊंचा नवा विक्रम; उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीच झळकले मुख्यमंत्री फडणवीसांचे होर्डिंग्ज
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा.

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक.

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप.

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप