AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Motorola edge 50 Pro ची मार्केटमध्ये होणार धमाकेदार एण्ट्री, पाहा काय वैशिष्ट्ये

मोटोरोलाने अखेर आपल्या आगामी आकर्षण असलेल्या स्मार्टफोन गुपित उघड केले आहे. मोटोरोलाचा हा नवीन फोन Motorola Edge 50 Pro असणार आहे. हा फोन लवकरच ग्राहकांसाठी लाँच करण्यात येणार आहे. Motorola हा डीव्हाईस AI कॅमेरा स्पेक्सने सुसज्ज असणार आहे.

Motorola edge 50 Pro ची मार्केटमध्ये होणार धमाकेदार एण्ट्री, पाहा काय वैशिष्ट्ये
Motorola edge 50 ProImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Mar 18, 2024 | 6:23 PM
Share

नवी दिल्ली | 18 मार्च 2024 : गेल्या काही दिवसांपासून मोटोरोला कंपनीच्या आगामी आकर्षण असलेल्या Motorola edge 50 Pro स्मार्टफोन कंपनी नेमके केव्हा बाजारात उतरविणार हे स्पष्ट झाले नव्हते. आता सर्व शंकाना दूर करीत कंपनीने आपला हा फोन लवकरच बाजारात उतविणार असल्याचे म्हटले जात आहे. या स्मार्टफोनमधील कॅमेरा हा आधुनिक AI कॅमेरा असणार असून त्यामुळे अतिशय उत्कृष्ट फोटो काढता येणार आहेत.

मोटोरोला कंपनीचा आगामी आकर्षण असलेला फोनची जाहीरात कंपनीने केलेली आहे. मोटोरोलाने आपल्या नवीन फोनचा लॅंडींग पेज ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर तयार केले आहे. या फोनला तगड्या AI कॅमेऱ्यासह उतरविले जाणार आहे. मोटोरोला कंपनीने आपल्या फोनच्या डीझाईन लूक आणि काही वैशिष्ट्यांची आपल्या टीजरमध्ये माहीती दिली आहे. मोटोरोलाचा हा नवा फोन Intelligence meets Art या टॅगलाईनने बाजारात उतरविला जात आहे.

मोटोरोलाची खास वैशिष्ट्ये

मोटोरोला कंपनीने कन्फर्म केले आहे की आपला आगामी Motorola edge 50 Pro हा फोन 6.7 इंच 1.5K 144Hz कर्व्ह पोल्ड डिस्प्ले सह बाजारात उतरविला जाणार आहे. फोनमध्ये 2000 निट्स पीक ब्राईटनेस, HDR 10+ सपोर्ट आणि कॉर्निंग गोरील्ला ग्लास 5 प्रोटेक्शन सह आहे. मोटोरोलाचा हा नवा भन्नाट फोन 50 MP रियर कॅमेरा आणि 13 MP अल्ट्रा वाईड कॅमेऱ्यासह उपलब्ध होणार आहे. हा फोन मॅक्रो सेंसरसह येणार आहे.

मोटोरोला फोन एआय अडॅप्टिव्ह स्टॅब्लायजेशन, ऑटो फोकस ट्रॅकींग, एआय फोटो एंहान्समेंट इंजन आणि टिल्ट मोडसह येणार आहे. हा फोन जगातील पहिल्या pantone validated कॅमेऱ्यासह बाजारात येणार आहे. जो ट्रु कलर्सना कॅप्चर करू शकणार आहे. मोटोरोला फोन बाजारात तीन रंगात खरेदी करु शकणार आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.