AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात ‘या’ दिवशी लाँच होणार मोटोरोलाचा हा फोल्डेबल फोन, जाणून घ्या तारीख आणि फिचर्स

मोटोरोला रेझर फोल्ड हा स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. कंपनीने फोनच्या लाँचची तारीख निश्चित केली आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण लाँच झाल्यानंतर हा फोन कोणत्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्री उपलब्ध असेल हे जाणून घेऊयात.

भारतात 'या' दिवशी लाँच होणार मोटोरोलाचा हा फोल्डेबल फोन, जाणून घ्या तारीख आणि फिचर्स
Motorola foldable phone
| Edited By: | Updated on: May 10, 2026 | 8:08 AM
Share

मोटोरोला कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातीला मोटोरोला रेझर फोल्ड फोनच्या लाँचबद्दल माहिती एक्स वर दिली आहे. आता कंपनीने या आगामी फोल्डेबल फोनच्या लाँचची तारीख जाहीर केली आहे. तर हा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर कंपनीने हे देखील सांगितले आहे की मोटोरोलाचा हा फोल्डेबल फोन कंपनीच्या वेबसाइटसोबतच फ्लिपकार्टवरही विकला जाईल. तर हा फोन अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आधीच लाँच करण्यात आलेला आहे. हा हँडसेट मार्चमध्ये MWC 2026 दरम्यान सादर करण्यात आला होता. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची लाँच तारीख तसेच फिचर्स जाणून घेऊयात.

मोटोरोला इंडियाने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर घोषणा केली आहे की, मोटोरोला रेझर फोल्ड हा फोन 13 मे रोजी भारतात लाँच केला जाईल. या फोनसाठी फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइटवर एक स्वतंत्र मायक्रोसाइटदेखील तयार करण्यात आली आहे.

मोटोरोला रेझर फोल्डची फिचर्स

डिस्प्ले: मोटोरोलाच्या या फोनमध्ये 8.1-इंचाचा आतील डिस्प्ले आहे, ज्यावर तुम्ही एकाच वेळी तीन ॲप्स चालवू शकता. हा फोन 6200 निट्सची कमाल ब्राइटनेस, 2के रिझोल्यूशन आणि HDR10+ सपोर्टसह येतो. बंद असताना या फोनमध्ये 6.6-इंचाचा बाहेरील डिस्प्ले असतो.

बॅटरी: या फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी असेल, जी फोल्डेबल फोनमधील आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे. मोठी बॅटरी असूनही फोन फार जड वाटत नाही. यात 80W फास्ट चार्जिंगची सुविधा देखील आहे.

कॅमेरा: मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा सोनी लायटिया 828 प्रायमरी कॅमेरा, सोबतच मॅक्रो व्हिजनसह 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सलचा टर्शियरी कॅमेरा. फोन बंद असताना त्यात 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि उघडल्यावर आतील स्क्रीनवर 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल.

प्रोसेसर: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 5 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

मोटोरोला रेझर फोल्डची किंमत

हा फोन MWC 2026 मध्ये 1999 युरो म्हणजेच भारतीय चलना नूसार अंदाजे 2 लाख 14 हजार 200 रुपये किमतीला लाँच करण्यात आला होता. सध्या हा फोन भारतीय बाजारपेठेत कोणत्या किमतीत लाँच केला जाईल हे अद्याप कंपनीने सांगितलेलं नाहीये.

Follow Us
चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
मोठी बातमी! चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! चिंचवडच्या यात्रेतील व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक
Pune -Nashik | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर
स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड
Pune | स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड, विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप
म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
.....म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी
मोठी घडामोड! उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ
सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर
बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील?
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....