AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Offer: 50 दिवस मोफत ‘trial offer’चा घ्या लाभ, ऑफर न आवडल्यास पैसे परत, मुकेश अंबानींनी ग्राहकांना केले खूश!

मुकेश अंबानी यांच्या कंपनीने ग्राहकांसाठी 50 दिवसांची मोफत ट्रायल ऑफर आणली आहे, या ऑफर अंतर्गत तुम्ही कंपनीच्या सेवेचा लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला कंपनीची सेवा 50 दिवसांच्या आत आवडली नाही, तर तुमचे पैसे परत केले जातील तुम्ही या ऑफरचा फायदा कसा घेऊ शकता? हे जाणून घ्या.

Jio Offer: 50 दिवस मोफत 'trial offer'चा घ्या लाभ, ऑफर न आवडल्यास पैसे परत, मुकेश अंबानींनी ग्राहकांना केले खूश!
Mukesh AmbaniImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 17, 2025 | 7:57 PM
Share

Reliance Jio ही टेलिकॉम कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक प्लॅन लाँच करत असते. तसेच अनेक प्लॅन हे सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन लाँच केलेले असतात. याचा फायदा अनेक लोकांना होत असतो. अशातच मुकेश अंबानी यांच्या कंपनीने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर सादर केली असून या ऑफरचे नाव आहे झिरो रिस्क ट्रायल. मुकेश अंबानी यांच्या कंपनीची ही ऑफर कंपनीच्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांसाठी आहे. तुम्हाला या Jio ऑफरचा लाभ कसा मिळेल याबद्दल आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

ऑफर डिटेल्स जाणून घ्या

या ऑफरचा लाभ JioFiber आणि AirFiber वर उपलब्ध आहे, परंतु लक्षात घ्या की ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे जी केवळ 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत वैध असेल. या ऑफरचा लाभ घेतल्यानंतर तुम्हाला मोफत इंटरनेट सेवा, टीव्ही चॅनेल आणि ओटीटी ॲप्सचा लाभ घेता येणार आहे. ट्रायल ऑफर अंतर्गत, तुम्हाला विनामूल्य सेट-टॉप बॉक्स, विनामूल्य राउटर आणि विनामूल्य इंस्टॉलेशनचा लाभ दिला जाईल.

विद्यमान ग्राहकांसाठी ऑफरचा लाभ

Jio Fiber आणि Jio AirFiber वापरणारे कंपनीचे विद्यमान ग्राहक देखील अतिरिक्त 50 दिवसांसाठी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ही ऑफर सक्रिय करण्यासाठी, विद्यमान वापरकर्त्यांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावरून 60008 60008 वर WhatsApp वर ‘Trial’ संदेश पाठवावा लागेल. तसेच या ट्रायल ऑफरचा फायदा तेव्हाच जोडला जाईल जेव्हा कंपनीने सांगितलेली रक्कम तुम्ही भरता किंवा रिचार्ज करता तेव्हा लाभ जोडला जाईल.

नवीन ग्राहकांसाठी माहिती

टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, तुम्ही जर रिलायन्स जिओचे नवीन ग्राहक असाल आणि तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या 50 दिवसांच्या ट्रायल ऑफरचा लाभ घेण्यासाठी 1234 रुपये इतकी रिफंडेबल अमाऊंट द्यावी लागेल. जर तुम्हाला 50 दिवसांनंतर सेवा सुरू ठेवायची असेल तर तुम्ही ते करू शकता, परंतु जर तुम्हाला कंपनीची सेवा आवडत नसेल तर तुम्ही कंपनीकडून पैसे काढू शकता.

त्यासोबत नवीन ग्राहकांनी ही गोष्ट लक्षात घ्या कि या प्लॅन मध्ये तुम्ही जो परतावा म्हणजे रिफंडेबल अमाऊंट घेताना यातून सरकारी शुल्क वजा केल्यावर तुम्हाला 979 रुपये परत केले जातील. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या जिओ स्टोअरला भेट देऊन या ऑफरबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.