AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलमधील स्पर्धा जिंकल्यानंतर मुकेश अंबानींची गॅझेटमध्ये मोठी खेळी, सर्वात कमी किंमतीत जिओचा लॅपटॉप, फिचर मात्र दमदार

mukesh ambani: लॅपटॉपची स्क्रीन 11.6 इंच आहे. त्याचे वजन 990 ग्रॅम आहे. हा एकाच रंगात उपलब्ध आहे. यामध्ये 64GB स्टोअरेज आहे. RAM 4GB आहे. Jio चा दावा आहे की, लॅपटॉपची बॅटरी लाईफ 8 तास आहे.

मोबाईलमधील स्पर्धा जिंकल्यानंतर मुकेश अंबानींची गॅझेटमध्ये मोठी खेळी, सर्वात कमी किंमतीत जिओचा लॅपटॉप, फिचर मात्र दमदार
| Updated on: Oct 14, 2024 | 12:30 PM
Share

कधीकाळी मोबाईलला आउटगोइंग कॉल करण्यासाठी नव्हे तर आलेले कॉल (इनकमिंग कॉल) पैसे लागत होते. परंतु रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून आणली. इनकमिंग कॉल मोफत झाले, त्यानंतर अनलिमिटेड आउटगोइंग कॉलचे प्लॅन आणले. त्यामुळे मोबाईल प्रत्येकाच्या हातात आला. आता मुकेश अंबानी यांनी आणखी एका गॅझेटमध्ये क्रांती घडवण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहे. जिओचा लॅपटॉपची किंमत कमी झाली असून १२ हजारात लॅपटॉप मिळत आहे. हा लॅपटॉप Amazon.in किंवा Reliance Digital मधून घेता येतो. JioBook 11 लॅपटॉप कार्यालयीन कामांसाठी वापरता येईल. तसेच विद्यार्थ्यांसाठी हे सर्वात चांगले लॅपटॉप ठरणार आहे. विशेष म्हणजे हे Android 4G लॅपटॉप आहे.

कमी किंमतीत जिओचा लॅपटॉप चांगला पर्याय आहे. JioBook लॅपटॉप 12,890 रुपयांमध्ये मिळत आहे. हा लॅपटॉप 2023 मध्ये लॉन्च केला होता. आता JioBook ची किंमत कमी करण्यात आली आहे. लॉन्च केला तेव्हा हा लॅपटॉप 16,499 रुपयांना मिळत होता. परंतु आता त्याची किंमक 12,890 रुपये केली आहे.

काय, काय मिळणार लॅपटॉपमध्ये मिळणार

Jio ने च्या लॅपटॉमध्ये MediaTek 8788 CPU आहे. तो JioOS वर चालतो. त्यामुळे तो 4G मोबाइल नेटवर्कला कनेक्ट करता येतो. तसेच वायफाय नेटवर्क त्यामुळे मिळणार आहे. या लॅपटॉपची स्क्रीन 11.6 इंच आहे. त्याचे वजन 990 ग्रॅम आहे. हा एकाच रंगात उपलब्ध आहे. यामध्ये 64GB स्टोअरेज आहे. RAM 4GB आहे. Jio चा दावा आहे की, लॅपटॉपची बॅटरी लाईफ 8 तास आहे.

लॅपटॉपसाठी 100GB क्लाउड स्टोरेज

जिओकडून 12 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. लॅपटॉपमध्ये इनफिनिटी की बोर्ड आणि मोठा टचपॅड दिला जात आहे. त्यामुळे काम करणे अधिक चांगले होते. या लॅपटॉपमधून अशा लोकांना टारगेट केले आहे, जे अभ्यास करु इच्छिता आणि  पीपीटी तसेच वर्ल्ड डॉकेमेंटमध्ये काम करु इच्छिता. हा लॅपटॉप तुम्ही 12,890 रुपयांमध्ये घेऊ शकतात. वेबकॅम आणि स्टीरियो स्पीकरमुळे व्हिडिओ कॉलिंग करता येते. या लॅपटॉपसाठी 100GB क्लाउड स्टोरेज आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.