UPI पेमेंट मार्केटमध्ये जिओची धमाकेदार एंट्री, Paytm, PhonePe, Google Pay चे वाढले टेन्शन!

UPI Payment | पेटीएमला धक्का बसल्यानंतर आता इतर अनेक खेळाडू सक्रिय झाले आहेत. Flipkart ने युपीआय पेमेंट सुरु केली आहे. तर आता मुकेश अंबानी यांची जिओ पण युपीआयच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे Paytm, PhonePe, Google Pay चे टेन्शन वाढले आहे.

UPI पेमेंट मार्केटमध्ये जिओची धमाकेदार एंट्री, Paytm, PhonePe, Google Pay चे वाढले टेन्शन!
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 3:57 PM

नवी दिल्ली | 8 March 2024 : Jio ने अत्यंत कमी कालावधीत भारतीय दूरसंचार बाजारात स्वतःची मोठी ओळख निर्माण केली आहे. कंपनीने अनेक बदल केले आहेत. आता UPI पेमेंट मार्केटमध्ये जिओने धमाकेदार एंट्री करण्याची तयारी सुरु केली आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक दुकानांवर Paytm Soundbox पाहिले असतील. तुम्ही ज्यावेळी पेमेंट करता, त्यावेळी किती रुपयांचे पेमेंट झाले, हे हा साऊंड बॉक्स सांगतो. पण आता या त्याची जागा कदाचित जिओ पे घेऊ शकते.

Jio Pay App साठी मोर्चे बांधणी

तर Jio Pay App अगोदरच बाजारात आहे. पण युपीआय पेमेंटसाठी नवनवीन कल्पना लढवल्या जात आहेत. व्यवसाय वृद्धीसाठी आणि प्रचारतंत्राचा भाग म्हणून कंपनी आक्रमक धोरण राबविणार आहे. कंपनीने Jio Soundbox ची चाचणी सुरु केली आहे. लवकरच जिओ साऊंडबॉक्स तुम्हाला अनेक दुकानांवर दिसून येईल. त्यामुळे मुकेश अंबानी थेट पेटीएम, फोनपे आणि गुगल पेला टक्कर देऊ शकणार आहे. साऊंडबॉक्ससोबतच व्यापाऱ्यांवर ऑफरचा पाऊस पडणार आहे.

हे सुद्धा वाचा

पेटीएमवरील कारवाई जिओच्या पथ्यावर

तर पेटीएम पेमेंट बँकेवरील आरबीआयची कारवाई जिओसह इतर कंपन्यांच्या पथ्यावर पडली आहे. फ्लिपकार्टने पण युपीआय पेमेंट विश्वात पाऊल ठेवले आहे. तर पेटीएमला झटका बसल्यानंतर जिओने पण आक्रमक धोरण स्वीकारत बाजारात धमाकेदार एंट्री करण्याचे ठरवले आहे. पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयने लगाम कसला आहे. आता या बँकेला कारभार करता येणार नाही. पण पेटीएम युपीआयवर त्याचा कोणताच परिणाम होणार नाही. जिओने घेतलेल्या या पवित्र्याने इतर युपीआय खेळाडूंना घाम फुटला आहे. ग्राहकांना आता याचा मोठा फायदा होऊ शकतो. ऑफर्सचा भडीमार होऊ शकतो.

पेमेंट झाल्याची तात्काळ वर्दी

तर जिओ हे साऊंडबॉक्स बाजारात वितरीत करणार असल्याचे समोर येत आहे. सध्या पेटीएमने यामध्ये आघाडी घेतली आहे. अनेक छोट्या-मोठ्या दुकानात हा साऊंडबॉक्स पेमेंट झाल्यावर त्यासंबंधीची घोषणा करतो. म्हणजे पेमेंट किती रुपयांचे करण्यात आले हे पाहण्यासाठी दुकानदाराला वारंवार मोबाईल चेक करावा लागत नाही. आता जिओ पण हाच प्रयोग करणार आहे. त्याचा युझर्सला आणि दुकानदाराला मोठा फायदा होईल.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.