AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त तीन महिन्यांत नेटफ्लिक्सने कमावलं एवढं? आकडे ऐकून थक्क व्हाल!

नेटफ्लिक्सने 2025 ची पहिली तिमाही दमदार कमाई आणि नव्या उपक्रमांसह गाठली आहे. कमाईत 13% वाढ, सब्सक्राइबर्समध्ये भर, जाहिरातीत गुंतवणूक आणि भारतात स्थानिक कंटेंटवर लक्ष केंद्रित करत नेटफ्लिक्सने स्ट्रीमिंग मार्केटमध्ये आपली आघाडी अधिक मजबूत केली आहे.

फक्त तीन महिन्यांत नेटफ्लिक्सने कमावलं एवढं? आकडे ऐकून थक्क व्हाल!
netflix
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 10:25 PM
Share

2025 च्या पहिल्या तिमाहीत नेटफ्लिक्सने जोरदार आर्थिक यश मिळवलं आहे. कंपनीने आपल्या महसुलात तब्बल 13% वाढ नोंदवली असून, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सकारात्मक कामगिरीचा फायदा नेटफ्लिक्सच्या शेअर किमतीतही दिसून आला असून त्यात सुमारे 2% वाढ झाली आहे. या यशाचं श्रेय वाढलेल्या सब्सक्रिप्शन्सना आणि जाहिरातीतून मिळालेल्या उत्पन्नाला दिलं जात आहे. विशेष म्हणजे, यावेळी कंपनीने सब्सक्राइबर आकडेवारी जाहीर केली नाही, कारण आता नेटफ्लिक्सचं लक्ष महसूल आणि आर्थिक निकषांवर केंद्रित आहे.

कंपनीने 2025 साठी 43.5 ते 44.5 अब्ज डॉलर्स इतका महसुलाचा अंदाज जाहीर केला आहे. नेटफ्लिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग पीटर्स यांनी स्पष्ट केलं की, जागतिक बाजारातील अस्थिरतेचा कंपनीच्या कामकाजावर फारसा परिणाम झालेला नाही. मनोरंजन उद्योगामध्ये टिकून राहण्याची नेटफ्लिक्सची क्षमता हीच त्याची खरी ताकद असल्याचं त्यांनी सांगितलं.

नेटफ्लिक्सला पसंती

जानेवारी 2025 मध्ये नेटफ्लिक्सने आपल्या सर्व प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. आता स्टँडर्ड प्लॅन $17.99, जाहिरात-सहाय्यित प्लॅन $7.99 आणि प्रीमियम प्लॅन $24.99 इतका झाला आहे. किंमती वाढल्यानंतरही ग्राहकांनी नेटफ्लिक्सला पसंती दिली असून, ‘स्क्विड गेम 2’ सारख्या लोकप्रिय मालिकांनी आणि थेट क्रीडा प्रसारणांनी प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. 2024 च्या अखेरीस नेटफ्लिक्सने 1.89 कोटी नवीन सब्सक्राइबर्स जोडले असून, एकूण सदस्यसंख्या 30.2 कोटींवर पोहोचली आहे.

जाहिरात क्षेत्रातही नेटफ्लिक्सने पाय रोवायला सुरुवात केली आहे. एप्रिल 2025 मध्ये कंपनीने अमेरिकेत स्वतःचं अ‍ॅड-टेक प्लॅटफॉर्म सुरू केलं असून, लवकरच ते इतर देशांमध्येही उपलब्ध होईल. या माध्यमातून परवडणाऱ्या योजनांसह दर्जेदार कंटेंट देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. जाहिरात उत्पन्न दुप्पट होण्याची शक्यता असून, तज्ज्ञांच्या मते हा विभाग भविष्यात नेटफ्लिक्सच्या महसुलात मोठा वाटा उचलेल.

भारतात 61 लाखांहून अधिक ग्राहक

भारत नेटफ्लिक्ससाठी सर्वात वेगाने वाढणारा बाजार ठरत आहे. 2025 मध्ये कंपनीने भारतात कंटेंटसाठी 18 अब्ज डॉलर्स गुंतवले असून, 28 नवीन ओरिजिनल प्रोजेक्ट्ससह स्थानिक स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. ‘ज्वेल थीफ: द हाइस्ट बिगिन्स’ आणि आर्यन खानचा ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ हे काही प्रमुख प्रकल्प आहेत. याशिवाय WWE सोबतची भागीदारीही प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. नेटफ्लिक्सकडे भारतात 61 लाखांहून अधिक ग्राहक असून, स्थानिक कंटेंटमुळे डिज्नी+ हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइम यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करणे सोपे झाले आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.