नेटफ्लिक्स आता मोबाईल व्हिडीओ गेम लाँच करणार; ‘या’ कारणामुळे कंपनीने घेतला हा निर्णय

कोरोना महामारीचा नेटफ्लिक्सच्या व्यापारावर खूप मोठा परिणाम झाला आहे. कारण कोरोनाच्या निर्बंधांमुळे कोणतेही शूट होऊ शकलेले नाही. अशा परिस्थिती ग्राहकांपर्यंत नवीन काही पोहचत नसल्याने त्याचा फटका नेटफ्लिक्सला बसला आहे.

नेटफ्लिक्स आता मोबाईल व्हिडीओ गेम लाँच करणार; 'या' कारणामुळे कंपनीने घेतला हा निर्णय
नेटफ्लिक्स आता मोबाईल व्हिडीओ गेम लाँच करणार

नवी दिल्ली : नेटफ्लिक्स आता मोबाईल व्हिडिओ गेममध्ये एन्ट्री करणार आहे. टीव्ही स्ट्रीमिंग सर्व्हिसमध्ये स्पर्धा वाढली आहे. या क्षेत्रात सबस्क्रायबर वाढण्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे कंपनीने आता व्हिडीओ गेममध्ये प्रगती करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. जे लोक कोरोना लॉकडाऊन काळात घरात होते, ते लोक नोकरी-धंद्यानिमित्त घरातून बाहेर पडू लागले आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या स्बस्क्रायबरच्या संख्येवर होत आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सची चिंता वाढली आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या व्यापारानंतर 531.10 डॉलरवर रेंगाळत होते. याच पार्श्वभूमीवर कंपनीने मोबाईल गेमकडे लक्ष वळवले आहे. (Netflix will now launch mobile video games; The company took this decision for this reason)

कोरोना महामारीचा परिणाम

कोरोना महामारीचा नेटफ्लिक्सच्या व्यापारावर खूप मोठा परिणाम झाला आहे. कारण कोरोनाच्या निर्बंधांमुळे कोणतेही शूट होऊ शकलेले नाही. अशा परिस्थिती ग्राहकांपर्यंत नवीन काही पोहचत नसल्याने त्याचा फटका नेटफ्लिक्सला बसला आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये नेटफ्लिक्सने दुसऱ्या तिमाहीत जवळजवळ 4,30,000 ग्राहक कमी झाल्याची माहिती दिली. केवळ 10 वर्षांमध्ये तिसऱ्या तिमाहीत घट झाली आहे.

ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही

स्ट्रीमिंग व्हिडिओ अग्रणी असलेल्या नेटफ्लिक्सने म्हटले आहे की, कंपनी सध्या आपल्या व्हिडिओ गेमच्या प्रस्तावाचा विस्तार करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. ग्राहकांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता व्हिडीओ गेम उपलब्ध असेल. कंपनीचा सुरुवातीला मुख्यत्वे मोबाइल गेम्सवर फोकस राहणार आहे, असेही जाहीर करण्यात आले आहे. कंपनीने भागधारकांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, “आम्ही गेमिंगला आमच्यासाठी आणखी एक नवीन कंटेंट कॅटेगरीच्या रूपात पाहत आहोत. ही योजना मूळ चित्रपट, अॅनिमेशन आणि अनस्क्रिप्टेड टीव्हीमधील आमच्या विस्ताराच्या समान आहे.”

मुख्य संचालन अधिकारी आणि मुख्य उत्पादक अधिकारी ग्रेग पीटर्स यांनी सांगितले की, नेटफ्लिक्स हिटशी संबंधित शो आणि चित्रपटांपासून आम्ही गेमची सुरुवात करणार आहोत. “आम्हाला माहित आहे की त्या कहाण्यांचे प्रशंसक कहाण्या खोलपर्यंत जाणून घेऊ इच्छितात. याच पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्सने “स्ट्रेंजर थिंग्स” आणि “द डार्क क्रिस्टल: एज ऑफ रेसिस्टेन्स”सह सिरीजशी संबंधित काही शीर्षकांसह व्हिडिओ गेममध्ये डब केले आहे.

नेटफ्लिक्सने जाहीर केले आहे की कंपनी दुसऱ्या लाईन अपमध्ये अनेक गोष्टी घेऊन येईल. कंपनीला आशा आहे की, गेम लाँच झाल्यानंतर आणखी युजर्स जोडले जातील. जर महामारी हळूहळू काढता पाय घेऊ लागली तर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कंपनी आणखी काही शानदार कंटेन्ट्स ग्राहकांसाठी सादर करू शकणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांचीही उत्सुकता वाढली आहे. (Netflix will now launch mobile video games; The company took this decision for this reason)

इतर बातम्या

मुंबईसाठी पुढील 24 तास कठीण, हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’

पनवेलचे भूमिपूत्र अभिजीत पाटील ‘मेड इन इंडिया आयकॉन 2021’चे मानकरी, राज्यपालांच्या हस्ते सन्मान

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI