मुंबईसाठी पुढील 24 तास कठीण, हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’

भारतीय हवामान खात्यानं पुढील 24 तास मुंबईसाठी 'रेड अलर्ट' जारी केलाय. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीसाठी पुढील 24 तास कठीण असणार आहेत.

मुंबईसाठी पुढील 24 तास कठीण, हवामान विभागाचा 'रेड अलर्ट'
हवामान खात्याकडून मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 10:17 PM

मुंबई : भारतीय हवामान खात्यानं पुढील 24 तास मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केलाय. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीसाठी पुढील 24 तास कठीण असणार आहेत. आगामी काही काळ मुंबईत तुफान पाऊस (Mumbai Rains) होण्याचा अंदाज आहे. आधी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र आता बदललेल्या परिस्थितीनुसार यात बदल करत रेड अलर्ट देण्यात आलाय, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी डॉ. जयंत सरकार यांनी दिलीय. विशेष म्हणजे मुंबईत रविवारी आणि सोमवारी देखील मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं.

दक्षिण गुजरात किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पावसाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई आणि आजूबाजूच्या भागात ‘‘वायु प्रणाली’’ तयार झाल्यात. याचा परिणाम म्हणून कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. मराठावाड्यात गुरुवारपर्यंत (22 जुलै) मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो.

हवामान विभागाच्या माहितीतील महत्त्वाचे मुद्दे

  • आयएमडीकडून मुंबईला रेड अलर्ट. ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊसाचा अंदाज. नवी मुंबई आणि पालघरच्या काही भागात पाऊस होऊ शकतो.
  • 22 जुलैपर्यंत परिस्थिती सुधारण होण्याची शक्यता नाही. मुंबई, ठाणे, पालघरसाठी आधीच ऑरेंज अलर्ट होता. आता रेड अलर्ट असल्यानं या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
  • रायगड, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज.
  • 45-50 किलोमीटर प्रति तास ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारं वाहण्याची शक्यता.

हेही वाचा :

ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

राज्यात 5 जिलह्यात रेड अलर्ट; मुंबईत समुद्रात हायटाईडचा इशारा

मुंबई कोकणात धुवाँधार मात्र मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा, धरणक्षेत्रात पाऊसच नाही!

व्हिडीओ पाहा :

Weather Red alert for Mumbai for next 24 hours by IMD

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.