नोकियाचा नवा फोन लवकरच बाजारात, लाँचिंगचा मुहूर्त ठरला

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : नोकिया कंपनी 7 मे रोजी भारतात नोकिया 4.2 स्मार्टफोन लाँच करणार आहे. एचएमडी ग्लोबलने ट्विटरवर टीजर व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली. या व्हिडीओमध्ये एलईडी नोटिफिकेशन लाईटसोबत पॉवर बटन दिले आहे. नोकिया 4.2 आणि नोकिया 3.2 बर्सिलोनामध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरही हे फोन लिस्ट केले आहेत. एचएमडी ग्लोबलने नोकिया 4.2 भारतात […]

नोकियाचा नवा फोन लवकरच बाजारात, लाँचिंगचा मुहूर्त ठरला

Follow us on

मुंबई : नोकिया कंपनी 7 मे रोजी भारतात नोकिया 4.2 स्मार्टफोन लाँच करणार आहे. एचएमडी ग्लोबलने ट्विटरवर टीजर व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली. या व्हिडीओमध्ये एलईडी नोटिफिकेशन लाईटसोबत पॉवर बटन दिले आहे. नोकिया 4.2 आणि नोकिया 3.2 बर्सिलोनामध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरही हे फोन लिस्ट केले आहेत.

एचएमडी ग्लोबलने नोकिया 4.2 भारतात लाँच करण्याबद्दलची घोषणा नोकिया मोबाईल इंडिया ट्विटर अकाऊंटवर केली आहे. शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आलेल्या टीजरमध्ये म्हटलं आहे की, लाँचिंग 4 दिवसांत केली जाईल, म्हणजेच 7 मे रोजी होईल. नोकिया 4.2 सोबत नोकिया 3.2 स्मार्टफोनही लाँच करणार का याबद्दल अजून कंपनीने स्पष्टीकरण दलेलं नाही.

नोकिया 4.2 ची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 2 जीबी + 16 जीबी व्हेरिअंटसाठी अंदाजे 11 हजार 700 रुपये, 3 जीबी + 32 जीबी व्हेरिअंटसाठी अंदाजे 13 हजार 800 रुपये आहे, तर नोकिया 3.2 ची किंमत अंदाजे 9 हजार 600 रुपये.

फीचर आणि स्पेसिफिकेशन

  • 5.71 इंच डिस्प्ले
  • ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर
  • 3 जीबी रॅम
  • 32 जीबी स्टोअरेज
  • रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल
  • सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सल
  • बॅटरी क्षमता 3000mAh
  • फिंगर प्रिंट स्कॅनर

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI