आता व्हॉट्सअॅपवरुन एकदाच 30 ऑडिओ क्लिप पाठवा

मुंबई : आपल्या युजर्सच्या सुविधा लक्षात घेता जगातील प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप नेहमीच नवनवीन फीचर युजर्सला देत असते. या नवीन अपडेट फीचरमध्ये युजर्सला ऑडिओ फाईल्स पाठवणे आणखी सोपे होणार आहे. लवकरच हे फीचर व्हॉट्सअॅप युजर्ससाठी सुरु करणार असल्याची माहिती ‘WABetaInfo’ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहे. WABetaInfo नुसार, व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉईड अॅप (व्हर्जन 2.19..1) वर […]

आता व्हॉट्सअॅपवरुन एकदाच 30 ऑडिओ क्लिप पाठवा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : आपल्या युजर्सच्या सुविधा लक्षात घेता जगातील प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप नेहमीच नवनवीन फीचर युजर्सला देत असते. या नवीन अपडेट फीचरमध्ये युजर्सला ऑडिओ फाईल्स पाठवणे आणखी सोपे होणार आहे. लवकरच हे फीचर व्हॉट्सअॅप युजर्ससाठी सुरु करणार असल्याची माहिती ‘WABetaInfo’ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहे.

WABetaInfo नुसार, व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉईड अॅप (व्हर्जन 2.19..1) वर एक नवीन फीचर आपल्याला मिळणार आहे. वेबसाईटने आपल्या एका ट्विटमध्ये लिहिलं आहे की, व्हॉट्सअॅप आपल्या ऑडीओ क्लिप पाठवण्याची पद्धत बदलण्यावर काम करत आहे. यामध्ये ऑडीओ क्लिपचा ऑडीओ प्रिव्ह्यू आणि फोटो प्रिव्ह्यू दिसणार आहे. तसेच एकाचवेळी तीस ऑडिओ क्लिप पाठवू शकणार आहे. हे फीचर भविष्यात उपलब्ध होणार आहे.

ट्विटरसोबत नवीन फीचर कसा असेल याचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये ऑडीओ क्लिप पाठवण्याची पद्धत आणि सध्याच्या  डिझाईनपेक्षा थोडे वेगळे दिसत आहे. तसेच एकाचवेळी तीस फाईल निवडण्याचे चिन्हंही दिसत आहे. हे फीचर सध्या अँड्रॉईड अॅपच्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. कंपनी लवकरच अँड्रॉईड आणि आयओएसवर हे फीचर उपलब्ध करणार आहे.

नुकतेच व्हॉट्सअॅपने दोन मोठे फीचर सुरु केले होते. यामध्ये एक फीचर PiP (पिक्चर-इन-पिक्चर) मोड होता. याच्या माध्यमातून युजर्सला चाटिंगमध्येच कोणत्याही यूट्यूब किंवा फेसबुकच्या व्हिडीओ लिंक पाहायला मिळत आहे. आता पूर्वीसारखे लिंकवर क्लिककरुन व्हिडीओ पाहण्याची पद्धत बंद करुन हे नवं फीचर व्हॉटसअॅपने सुरु केले आहे. याशिवाय ग्रुप चाट दरम्यान प्रायव्हेट रिप्लाय देण्याची सुविधाही दिली आहे.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.