एसी-कूलरच्या थंड वाऱ्यापासून मुलांना वाचवण्यासाठी ‘हे’ उपाय करा, आजार दूर राहतील
एसी किंवा कूलरची थेट हवा त्यांना नुकसान पोहोचवू शकते. त्यांची तब्येत बिघडण्याचा धोका असतो. मग अशा परिस्थितीत मुलांना थंडीपासून वाचवून त्यांची योग्य काळजी कशी घ्यावी, यासाठी या काही खास टिप्स नक्की वाचा.

सध्या कुठलाही महिना असो पण एसी आणि कूलरशिवाय राहणं अशक्य झालंय. पण लहान मुलं असलेल्या घरांमध्ये ही मोठी समस्या असते, कारण एसी-कूलरची थेट हवा त्यांना नुकसान पोहोचवू शकते. त्यांची तब्येत बिघडण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत मुलांना थंडीपासून वाचवून, त्यांची योग्य काळजी कशी घ्यावी, यासाठी काही खास टिप्स:
लहान मुलांची अशी घ्या काळजी
सध्याची उष्णता पाहता एसी आणि कूलरशिवाय राहणं कठीण आहे. पण घरात लहान बाळं असतील तर त्यांच्या आरोग्याची चिंता वाढते. एसी किंवा कूलरची थेट हवा मुलांना आजारी पाडू शकते, त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. अशावेळी मुलांना थंडीपासून वाचवूनही त्यांना आरामदायक झोप कशी द्यायची, हा प्रश्न अनेक पालकांना पडतो. चला तर मग, यावर काही महत्त्वाचे उपाय जाणून घेऊया.
एसीचं तापमान किती असावं?
जर तुम्ही तुमच्या लहान बाळाला एसीमध्ये झोपवत असाल, तर तापमानाकडे विशेष लक्ष द्या. बाहेर कितीही उष्णता असली तरी, एसीचं तापमान 23 ते 25 डिग्री सेल्सियस दरम्यान ठेवा. यामुळे मुलांना जास्त थंडी लागणार नाही आणि ते आजारी पडणार नाहीत.
कूलर वापरताना काय कराल?
कूलर वापरत असाल, तर मुलाचं अंथरूण कूलरच्या थेट समोर नसावं याची काळजी घ्या. खोलीत पंखाही चालू ठेवा. यामुळे कूलरची हवा पूर्ण खोलीत फिरेल आणि मुलांना थेट थंडी लागणार नाही, ज्यामुळे ते जास्त गारठणार नाहीत.
जर बाळ एसी किंवा कूलरच्या थेट समोर झोपण्याचा हट्ट करत असेल, तर त्याला एक पातळ सुती चादर नक्की ओढवा. यामुळे थेट हवा शरीराला लागणार नाही आणि बाळाला सर्दी होण्यापासून वाचवता येईल.
लहान मुलं झोपेत चादर बाजूला सारू शकतात. अशावेळी त्यांना पूर्ण बाह्यांचे (फुल स्लीव्ह) सुती कपडे घाला. यामुळे थंड हवेचा थेट संपर्क शरीराशी येणार नाही. लक्षात ठेवा, कपडे सुती असावेत जेणेकरून त्यांना गरम होणार नाही. एसी किंवा कूलरच्या थेट हवेमुळे मुलांना सर्दी, खोकला किंवा श्वसनाचे आजार होऊ शकतात, त्यामुळे ही खबरदारी खूप महत्त्वाची आहे.
कूलरच्या हवेत आर्द्रता (ओलावा) असते, तर एसीची हवा कोरडी असते. त्यामुळे मुलांना झोपवण्यापूर्वी त्यांच्या त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा बेबी ऑइल लावा. लहान मुलांची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे एसीमध्ये झोपवताना त्वचेला कोरडेपणा येऊ नये म्हणून हा उपाय खूप महत्त्वाचा आहे.
या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या लहान बाळांना उष्णतेपासून आराम देऊ शकता आणि एसी-कूलरच्या थेट वाऱ्यापासून सुरक्षित ठेवू शकता.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
