AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसीमुळे विजेचा वाढलेला खर्च टाळा,1.5 टन एसीसाठी किती सोलर पॅनल लागतील? हे जाणून घ्या

उन्हाळ्यात एसीशिवाय राहताच येत नाही, पण त्याचं वीजबिल झटक्यात खिशा रिकामा करतं! यावर उपाय म्हणजे सोलर पॅनल, पण 1.5 टन एसीसाठी नक्की किती पॅनल लागतात? तुमच्या बजेटचा आणि पर्यावरणाचाही विचार करत, आम्ही सांगणार आहोत संपूर्ण माहिती!

एसीमुळे विजेचा वाढलेला खर्च टाळा,1.5 टन एसीसाठी किती सोलर पॅनल लागतील? हे जाणून घ्या
ac
| Edited By: | Updated on: Jun 18, 2025 | 4:22 PM
Share

सध्या भारतात भीषण उकाडा जाणवत आहे. उत्तर भारतात तर तापमान ५० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले असून, एसीशिवाय जगणं कठीण झालं आहे. पण एसी चालवताना सर्वसामान्य माणसाला सर्वाधिक झळ पोहोचते ती म्हणजे वाढलेलं वीजबिल. एकीकडे उकाडा, दुसरीकडे वीजबिलाचा भार – या समस्येतून मार्ग म्हणून सोलर पॅनल हा उत्तम पर्याय म्हणून समोर येतो आहे.

सध्या अनेक लोक आपल्या घरांमध्ये सोलर पॅनल बसवत आहेत, जेणेकरून त्यांना विजेच्या महागड्या दरांपासून सुटका मिळेल. तुम्ही देखील जर 1.5 टन स्प्लिट एसी घरात वापरत असाल, तर हे जाणून घेणं आवश्यक आहे की यासाठी किती सोलर पॅनल लागतील आणि त्याचा फायदा काय होईल.

1.5 टन एसीची वीज खपत किती?

1.5 टन क्षमतेचा स्प्लिट एसी जर तुम्ही वापरत असाल, तर तो दर तासाला अंदाजे 1.5 ते 2 युनिट वीज खपत करतो. जर हा एसी तुम्ही रोज ८ तास चालवत असाल, तर दररोज 12 ते 16 युनिट विजेची गरज भासते. फाइव स्टार रेटिंग असलेले एसी थोडी कमी वीज घेतात, मात्र सरासरी वापराच्या दृष्टीने ही खपत गृहीत धरलेली आहे.

सोलर पॅनल किती युनिट वीज निर्माण करतो?

सामान्य 300 वॅटचा सोलर पॅनल प्रतिदिन 4 युनिट वीज निर्माण करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला एसी चालवण्यासाठी रोज 15 युनिट वीज लागणार असेल, तर किमान 4 ते 5 सोलर पॅनल लागतील.

सोलर पॅनल लावण्याचे फायदे काय?

सोलर पॅनल लावल्यानं सर्वात मोठा फायदा म्हणजे वीजबिलात मोठ्या प्रमाणात बचत होते. एकदाच केलेली गुंतवणूक ही अनेक वर्ष टिकते आणि दरमहा वीजबिल भरण्याचा त्रास कमी होतो. सौर ऊर्जा ही पर्यावरणपूरक आणि नवनिर्माणक्षम असल्याने ती प्रदूषणमुक्त ऊर्जा स्त्रोत मानली जाते. तसेच, सरकार सोलर पॅनलसाठी सबसिडी किंवा करसवलतीसारखे लाभही देते. शिवाय, वीजकपातीच्या काळातही सोलर पॅनलमुळे घरात आवश्यक उपकरणे चालू ठेवता येतात.

कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात?

सोलर पॅनल बसवण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. सर्वात आधी घराच्या छतावर पुरेशी जागा आणि दिवसभर चांगला सूर्यप्रकाश मिळतो का हे पाहावे. याशिवाय, पॅनलची गुणवत्ता, सोलर इन्व्हर्टर, बॅटरी स्टोरेजची गरज आणि इंस्टॉलेशनचा खर्च लक्षात घ्यावा. स्थानिक हवामान, वर्षभर सूर्यप्रकाश किती वेळ मिळतो याचा सुद्धा अंदाज असावा. यामुळे तुमच्या सोलर सिस्टमची कार्यक्षमता अधिक चांगली राहील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.