भारतीय बाजारात ‘या’ चायनीज स्मार्टफोनचा धुमाकूळ, 5,00,000 युनिट्सची रेकॉर्डब्रेक विक्री

POCO India कंपनीने गेल्या महिन्यात भारतात एक नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला होता. POCO M3 असं या स्मार्टफोनचं नाव आहे.

भारतीय बाजारात 'या' चायनीज स्मार्टफोनचा धुमाकूळ, 5,00,000 युनिट्सची रेकॉर्डब्रेक विक्री
smartphone
अक्षय चोरगे

|

Mar 28, 2021 | 7:00 AM

मुंबई : POCO India कंपनीने गेल्या महिन्यात भारतात एक नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनचं नाव POCO M3 असं असून हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. विक्रीसाठी उपलब्ध होताच काही वेळातच हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. त्यानंतर अनेकदा हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला तेव्हा बऱ्याचदा हा स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक झाला. सध्यादेखील याचे अनेक व्हेरिएंट्स आऊट ऑफ स्टॉक आहेत. (POCO M3 sales crosses half a million units in India; check price and specs)

लाँचिंगनंतर आतापर्यंत कंपनीने या स्मार्टफोनच्या पाच लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. विशेष म्हणजे हा माईलस्टोन गाठण्यासाठी POCO M3 ला केवळ 45 दिवसांचा कालावधी लागला आहे. हे 45 लाख स्मार्टफोन्स ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टद्वारे विकले आहेत. ज्या ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी कंपनीने एक नवी संधी दिली आहे. 29 मार्च रोजी दुपारी 12 वाजता या फोनचा फ्लिपकार्टवर सेल आयोजित करण्यात आला आहे. ज्यांना हा स्मार्टफोन हव्या त्या स्टोरेज प्रकारामध्ये अथवा कलर व्हेरिएंटमध्ये हवा आहे, ते ग्राहक 29 मार्चला दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन खरेदी करु शकतात.

किफायतशीर किंमत

कंपनीने POCO M3 स्मार्टफोनचे दोन वेरिएंट्स सादर केले आहेत. ज्यामध्ये 6GB RAM आणि 64GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये इतकी आहे, तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662G प्रोसेसरवर चालतो.

जबरदस्त फीचर्स

Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसह सादर करण्यात आला आहे. पोको एम 3 स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉयड 11 ऑपरेटिंग सिस्टिम बेस्ड एमआययूआय वर आधारित आहे. फोनमध्ये 6000 MAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पोको एम 3 स्मार्टफोन OnePlus 8T Cyberpunk 2077 स्पेशल एडिशन प्रमाणे डिझाइन करण्यात आलेला आहे. फोन ड्युअल टोन फिनिश आणि पोको ब्रँडिंग कॅमेर्‍यासह सादर करण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा (रियर कॅमेरा) देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेंसर सपोर्ट आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सला कॅमेरा देण्यात आला आहे. POCO M3 एक्सक्लूसिव्हली ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन कूल ब्लू, पॉवर ब्लॅक आणि येल्लो या कलर ऑप्शन्ससह लाँच केला आहे.

इतर बातम्या

8GB/128GB, डुअल सेल्फी कॅमेरासह Motorola चा दमदार स्मार्टफोन लाँच, किंमत…

4GB रॅम, 64GB स्टोरेज, 7,499 रुपयात शानदार स्मार्टफोन खरेदी करण्याची शेवटची संधी

Realme 8 series मधील दोन ढासू स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(POCO M3 sales crosses half a million units in India; check price and specs)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें