AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Primebook 2 Pro आणि Primebook 2 Max एआय लॅपटॉप झाले लाँच, 20 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध

प्राइमबुकने दोन नवीन बजेट-फ्रेंडली एआय लॅपटॉप लाँच केले आहेत. वीस हजार रूपयांपेक्षा कमी किमतीचे प्राइमबुक २ प्रो आणि प्राइमबुक २ मॅक्स मध्ये अनेक उत्तम फिचर्स देण्यात आलेले आहेत. चला तर मग यांची किंमत जाणून घेऊयात.

Primebook 2 Pro आणि Primebook 2 Max एआय लॅपटॉप झाले लाँच, 20 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध
Primebook 2 Pro आणि Primebook 2 Max एआय लॅपटॉप झाले लाँच, 20 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्धImage Credit source: Primebook
| Edited By: | Updated on: Sep 22, 2025 | 9:04 PM
Share

भारतातील पहिला अँड्रॉइड लॅपटॉप ब्रँड असलेल्या प्राइमबुकने दोन पॉवरफुल लॅपटॉप मॉडेल्स लाँच केले आहेत. अशातच तुम्हीही कमी बजेटमध्ये नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम ऑफर आहे. कारण कंपनीने 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत हे लॅपटॉप लाँच केलेले आहे. प्राइमबुक 2 प्रो आणि प्राइमबुक 2 मॅक्स हे विद्यार्थी, फ्रीलांसर, क्रिएटर्स आणि कोडर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. या नवीन मॉडेल्ससह, प्राइमबुकचे उद्दिष्ट एआय लॅपटॉप्स उपलब्ध करून देणे आहे.

प्राइमबुक 2 प्रो ची भारतातील किंमत

प्राइमबुक 2 प्रो ची किंमत 17,990 रुपये आहे, तर प्राइमबुक 2 मॅक्सची किंमत 19,990 रुपये आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तसेच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून दोन्ही लॅपटॉप मॉडेल्स खरेदी करू शकता. जर तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवरून पैसे दिले तर तुम्हाला 500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. स्पर्धेच्या बाबतीत हा लॅपटॉप एसर अस्पायर 3, लेनोवो क्रोमबुक, एएसयूएस क्रोमबुक आणि लेनोवो आयडियापॅड 3 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

प्राइमबुक 2 प्रो आणि प्राइमबुक 2 मॅक्सचे उत्तम फिचर्स

प्राइमबुक 2 प्रो आणि प्राइमबुक 2 मॅक्स हे दोन्ही लॅपटॉप अँड्रॉइड 15 वर आधारित प्राइमओएस 3.0 वर चालतात. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, दोन्ही मॉडेल्समध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ जी99 प्रोसेसर, 8जीबी रॅम देण्यात आलेले आहे.

प्राइमबुक 2 प्रो मध्ये 14.1 इंचाचा फुल एचडी रिझोल्यूशन आयपीएस अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे. 128 जीबी यूएफएस स्टोरेजसह सुसज्ज असलेला हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यावर 14 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतो.

प्राइमबुक 2 मॅक्समध्ये 15.6 इंचाचा फुल एचडी आयपीएस अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे. 256 जीबी स्टोरेजसह सुसज्ज असलेला हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यावर 12 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतो.

दोन्ही लॅपटॉपमध्ये 1440-पिक्सेल वेबकॅम, आवाज कमी करणारा मायक्रोफोन, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि जलद चार्जिंगसह ड्युअल USB-A आणि USB-C पोर्ट आहेत.

मायक्रोएसडी द्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कमी किंमत असूनही या लॅपटॉपमध्ये बॅकलिट कीबोर्ड आहे. दोन्ही लॅपटॉपमध्ये AI कम्पेनियन आणि AI-पॉवर्ड ग्लोबल सर्च सारख्या बिल्ट-इन AI फिचर्ससह देखील सुसज्ज आहेत.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.