ATM : केवळ युपीआय कोड स्कॅन करा एटीएमवर विना कार्ड रक्कम काढा

ATM : केवळ युपीआय कोड स्कॅन करा एटीएमवर विना कार्ड रक्कम काढा
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9

या सुविधेमुळे एटीएममधील फसवणुकीचे प्रकार कमी होतील. यामुळे कार्ड क्लोनिंग, स्किमिंग, एटीएम मशिनमध्ये छेडछाड आदी प्रकारही बऱ्याच अंशी रोखता येणार आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

May 21, 2022 | 6:00 PM

मुंबई : सर्वसामान्य लोकांना लवकरच मोठी सुविधा मिळणार आहे. डेबिट कार्डशिवाय (without Debit card) एटीएममधून (ATM) पैसे काढण्याची ही सुविधा आहे. आरबीआय बऱ्याच दिवसांपासून त्याची तयारी करत होती. आता आरबीआयने यासाठी बँकांना (Bank) सूचना दिल्या आहेत. तुम्हाला आता बातमी माहिती झाली आहे, पण तरीही याचा फायदा काय होणार, हे फिचर कसं काम करणार, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात घोळत असतील. देशातील सर्व बँका आणि एटीएम मशीन चालकांना कार्डशिवाय रोख रक्कम काढण्याची सुविधा द्यावी लागेल, असे रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे. देशातील मोजक्याच बँका सध्या एटीएम मशीनमधून कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा देत आहेत. अशी सुविधा देण्यात आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी बॅंकेचा (HDFC Bank) अग्रक्रम लागतो.

युपीआय पेमेंटच्या क्रांतीने बँकिंग क्षेत्रासह व्यवहारात ही क्रांती आणली आहे. आता हेच युपीआय पेमेंट अॅप तुम्हाला एटीएममध्ये ही उपयोगी ठरणार आहे. एटीएममध्ये डेबिट कार्ड वापरायची गरज आता भासणार नाही. देशातील काही ठिकाणी युपीआय पेमेंटच्या माध्यमातून एटीएममधून रक्कम काढता येते. आता ही सोय देशातील सर्वच एटीएममध्ये लवकरच सुरु करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) याविषयीचे दिशानिर्देश दिले आहेत. युपीआय पेमेंट अॅप पेटीएम, गुगल पे, अॅमेझॉन पेे, फोन पे यासह तुम्ही वापरत असलेल्या युपीआय पेमेंट अॅपच्या माध्यमातून ही सुविधा मिळेल.

डेबिट कार्ड होणार हद्दपार

या नव्या पद्धतीत तुमचे डेबिट कार्ड व्यवहारातून हद्दपार होईल. ग्राहक युपीआय पिनच्या वापरातून त्यांची अधिकृतता सिद्ध करतील आणि एटीएम मशीन मधून रक्कम बाहेर येईल. विशेष म्हणजे एटीएममधून युपीआय अॅपद्वारे रक्कम काढण्याची ही प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क असेल. कोविड काळात सुरक्षित आणि त्वरीत सेवेमुळे डिजिटल पेमेंटला लोकांनी प्रचंड पसंती दिली आणि या व्यवहारात प्रचंड वाढ झाली. यामध्ये राष्ट्रीय देयके महामंडळाने (National Payments Corporation of India (NPCI)) सुरु केलेल्या युपीआय सेवेने सर्वात मोठी भूमिका बजावली आहे.

हे सुद्धा वाचा

अशी काढा विना कार्ड रक्कम

विना कार्ड एटीएममधून रक्कम काढण्याची सुविधा काही ठराविक बँकेतच उपलब्ध आहे. लवकरच ती देशभरातील एटीएममध्ये सुरु होईल. युपीआय पेमेंटसाठी एटीएम मशीनमध्ये थोडेफार बदल करावे लागणार आहे. यामध्ये एटीएम मशीनमध्ये युपीआय पेमेंटचा पर्याय द्यावा लागेल. एटीएम मशीनच्या स्क्रीनवर क्युआर कोड द्यावा लागेल. रक्कम काढण्यासाठी ग्राहकाला त्याच्या मोबाईल मधील युपीआय ॲपची मदत घ्यावी लागणार आहे. ग्राहकाला त्याची इच्छित रक्कम एटीएम मशीनमध्ये नोंदवावी लागेल. त्यानंतर युपीआय पेमेंट पर्याय निवडावा लागेल. एटीएम मशीनच्या स्क्रीन वर दिसणारा क्युआर कोड तुमच्याकडे असलेल्या भीम, गुगल पे, अॅमेझॉन, फोन पे, पेटीएम यापैकी एका युपीआय पेमेंट अॅपद्वारे स्कॅन करावा लागेल. तुमचा पिन टाकावा लागेल. सबमिटचे बटण दाबावे लागेल. त्यानंतर खात्यातील रक्कम वळती होऊन ती एटीएम मशीनमधून रोखीच्या स्वरुपात तुम्हाला मिळेल.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें