AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Realme’ चा 5 G स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार

मुंबई : ऑनलाईन मार्केटमध्ये Realme या चीनी कंपनीच्या स्मार्टफोनची क्रेझ सध्या तरुण वर्गामध्ये वाढत आहे. नुकतंच Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 हे दोन स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी  Realme 3 हा स्मार्टफोन बाजारात लाँच केला होता आहे. त्यानंतर आता Realme तर्फे 5 जी स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत कंपनीने बाजारात  5 जी […]

'Realme' चा 5 G स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार
| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM
Share

मुंबई : ऑनलाईन मार्केटमध्ये Realme या चीनी कंपनीच्या स्मार्टफोनची क्रेझ सध्या तरुण वर्गामध्ये वाढत आहे. नुकतंच Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 हे दोन स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी  Realme 3 हा स्मार्टफोन बाजारात लाँच केला होता आहे. त्यानंतर आता Realme तर्फे 5 जी स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत कंपनीने बाजारात  5 जी फोन आणण्याची तयारी केली आहे.

Realme इंडियाचे CEO माधव सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत कंपनीने बाजारात  5 जी फोन आणण्याची तयारी केली आहे. या 5 जी स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन फ्लॅगशिप प्रोसेसर असणार आहे. हा प्रोसेसर असल्याने 5 जी मोबाइल कंपनीचा फ्लॅगशिप मोबाइल ठरु शकतो. भारतात 5 नेटवर्क लाँच होण्याआधी Realme भारतात स्मार्टफोन लाँच करेल, असा विश्वास Realme कंपनीने व्यक्त केला आहे”.

काऊंटर पॉईंट (Counterpoint) या रिसर्च बेस्ड कंपनीने मार्च 2019 मधील ऑनलाईन मार्केटद्वारे विकणाऱ्या स्मार्टफोनची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार Realme 3 या स्मार्टफोनची मार्च 2019 मध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. सध्या ऑनलाइन मोबाइल विक्रीमध्ये Realme कंपनीच्या मोबाईलला वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कंपनी लवकरच आता ऑफलाइन विक्रीवर लक्ष केंद्रीत करणार आहे.

गेल्या आठवड्यात Realme कंपनीने Realme X हा फॅल्गशिप स्मार्टफोन लाँच केला. यात 6.5 इंचाचा एचडी डिस्प्ले आणि octa-core Snapdragon 710 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये Anroid 9 pie हे Ios आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 3700 mAh इतकी आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि पॉप अप सेल्फी कॅमेराही देण्यातआला आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आलेत. हा फोनची किंमत भारतात 20  हजारपर्यंत असण्याची शक्यता आहे. अद्याप हा फोन भारतात लाँच करण्यात आलेला नाही.

संबंधित बातम्या :

Realme 3 स्मार्टफोनचा भारतात हटके रेकॉर्ड

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली