AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Realme Year End Sale : GT आणि Narzo सिरीजवर 4000 रुपयांचा डिस्काऊंट

Realme ने भारतात वार्षिक इयर एंड सेलची घोषणा केली आहे. सेल 26 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 30 डिसेंबरपर्यंत चालेल. हा सेल realme.com आणि Flipkart वर देखील आयोजित केला जाईल.

Realme Year End Sale : GT आणि Narzo सिरीजवर 4000 रुपयांचा डिस्काऊंट
Realme Smartphone
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 2:57 PM
Share

मुंबई : Realme ने भारतात वार्षिक इयर एंड सेलची घोषणा केली आहे. सेल 26 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 30 डिसेंबरपर्यंत चालेल. हा सेल realme.com आणि Flipkart वर देखील आयोजित केला जाईल. अनेक Realme स्मार्टफोन या सेल दरम्यान सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. Realme C-series, Narzo सीरीज स्मार्टफोन्स सोबत realme हँडसेट, realme GT Neo 2 5G सारखे प्रीमियम फ्लॅगशिप डिव्हाईसेस कमी किंमतीत खरेदी करता येतील. रियलमीच्या स्मार्टफोन्सवर 500 रुपयांपासून 4000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. (Realme annual Year End Sale : get upto 4000 rs discount on Narzo and GT series)

Realme च्या इयर एंड सेल दरम्यान, फ्लॅगशिप Realme GT Neo 2 5G 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 31,999 रुपयांपासून सुरू होईल. तर 12GB + 256GB स्टोरेज असलेल्या हाय-एंड मॉडेलची किंमत 35,999 रुपये असेल. त्याचप्रमाणे, Realme GT मास्टर एडिशन सेल दरम्यान 4000 रुपये कमी किंमतीत उपलब्ध होईल. यासह, फोनचा 6GB + 256GB स्टोरेज वेरिएंट 25,999 रुपये आणि 8GB + 128GB स्टोरेज पर्याय 27,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. 8GB + 256GB स्टोरेज असलेल्या टॉप-एंड मॉडेलची किंमत 29,999 रुपये असेल.

या रियलमी स्मार्टफोन्सवर डिस्काउंट

  • Realme 8 आणि Realme 8s 5G च्या बेस (8GB + 128GB) स्टोरेज मॉडेलवर अधिकृत Realme वेबसाइट आणि Flipkart द्वारे आयोजित केलेल्या सेल दरम्यान 2,000 रुपयांची कपात केली जाईल. यासह, Realme 8s 5G च्या 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे, तर त्याच कॉन्फिगरेशनचा Realme 8 हँडसेट 18,499 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
  • Realme 8 चे 6GB + 128GB स्टोरेज व्हर्जन आणि 8GB + 128GB स्टोरेज मॉडेल दोन्ही 1,500 रुपयांच्या प्राइस कटनंतर 16,999 रुपये आणि 17,999 रुपयांना उपलब्ध होतील.
  • Narzo सिरीजचा विचार केल्यास, Realme Narzo 50A 4GB + 64GB स्टोरेज मॉडेलवर 1000 रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे हा फोन 11,499 रुपये इतक्या किंमतीत सूचीबद्ध केला जाईल. त्याच वेळी, 4GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज असलेले हाय-एंड मॉडेल 12,499 रुपयांना विकले जाईल.
  • सेलमध्ये, बजेट-फ्रेंडली Realme C25Y वर 1000 रुपयांची सूट मिळेल. किमतीत कपात केल्यानंतर, 4GB + 64GB स्टोरेज मॉडेल 10,999 रुपयांना आणि 4GB + 128GB स्टोरेज पर्याय 11,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
  • Realme C21 3GB + 32GB स्टोरेज मॉडेल 500 रुपयांच्या प्राईस कटनंतर 9,499 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. 4GB + 64GB स्टोरेज असलेल्या टॉप-एंड मॉडेलची किंमत 10,499 रुपये असेल. 4GB + 64GB स्टोरेज कॉन्फिगरेशनसह Realme C21Y देखील 10,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

इतर बातम्या

WhatsApp News Emoji : व्हाट्सअॅपवर चॅटिंगची मजा होणार आणखी ‘रंगतदार’, इमोजीमध्ये आणणार व्हेरिएशन

Google Pay New Feature : ‘गुगल पे’मध्ये आलं नवं फिचर, आता ऑनलाइन पेमेंट होणार अधिक सोपं

गुगल मॅप्सचं Area Busy फीचर, कोरोना काळात तुम्हाला गर्दीपासून दूर राहण्यासाठी मदत करेल

(Realme annual Year End Sale : get upto 4000 rs discount on Narzo and GT series)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.