तब्बल 25 तासांचा तगडा बॅटरी बॅकअप, Realme चे Buds लाँचिंगसाठी सज्ज

तब्बल 25 तासांचा तगडा बॅटरी बॅकअप, Realme चे Buds लाँचिंगसाठी सज्ज

रियलमी कंपनी लवकरच तगडा बॅटरी बॅकअप असलेले बड्स लाँच करणार आहे. (Realme Buds Air 2 Teased to Come With 25 Hour Battery Life)

अक्षय चोरगे

|

Feb 22, 2021 | 12:01 PM

मुंबई : रियलमी बड्स एयर 2 (Realme Buds Air 2) चे स्पेक्स लीक झाले आहे. त्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार हे बड्स 24 फेब्रुवारी 2021 ला भारतात लाँच केले जाणार आहेत. दरम्यान, कंपनीने या बड्सच्या टीझर आणि डिझाईनबाबत माहिती देणं सुरु केलं आहे. या बड्सचं लाँचिंग दुपारी 12 वाजता होईल, अशी माहिती मिळाली आहे. कंपनीने यासाठी द चेनस्मोकर्ससोबत भागीदारी केली आहे. (Realme Buds Air 2 Teased to Come With 25 Hour Battery Life)

रियलमी बड्स एयर 2 (Realme Buds Air 2) च्या टीझरमध्ये पाहायला मिळतंय की, यामध्ये अॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन हे फीचर देण्यात आलं आहे, जे 10mm च्या डायमंड क्लास Hi- Fi ड्रायवर्ससह दिलं जाण्याची शक्यता आहे. रियलमी बड्स एयर 2 हे रियलमी बड्स एयर प्रोसारखेच आहेत.

रियलमी बड्स एयर 2 च्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये दोन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. व्हाईट आणि ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शन्सह हे बड्स लाँच केले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे बड्स तब्बल 25 तासांचा बॅटरी बॅकअप देतील, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने असं म्हटलंय की, केवळ 10 मिनिटं चार्ज केल्यानंतर हे बड्स तब्बल 2 तासांचा म्युझिक प्लेबॅक देतात.

यामधील इतर फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 10mm चे डायमंड क्लास Hi-Fi ड्रायवर्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे युजर्सना दमदार बेस, क्लियर साऊंड आणि जबरदस्त फ्रिक्वेंसी रेंज मिळते. या बड्समध्ये 25dB चं नॉइस कॅन्सलेशन फीचर देण्यात आलं आहे.

बड्स एयर 2 सोबत कंपनीने घोषणा केली आहे की, कंपनी लवकरच दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. यामध्ये रियलमी नार्झो 30 प्रो 5G आणि रियलमी नार्झो 30A चा समावेश आहे. रियलमी नार्झो 30 प्रो 5G एक प्रिमिय मॉडल असेल ज्यामध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 800U SoC प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच हा फोन पंचहोल डिझाईनसह सादर केला जाईल. या फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल.

इतर बातम्या

64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, इन्स्टंट डिस्काऊंटसह Samsung Galaxy F62 चा पहिला सेल

OnePlus 9 चे स्पेसिफिकेशन्स लीक, दमदार कॅमेरा, डिस्प्ले आणि बॅटरी बॅकअप, जाणून घ्या सर्वकाही

5000mAh बॅटरी, 6.5 इंच डिस्प्ले, किंमत अवघी 7499, Moto चा दमदार स्मार्टफोन लाँच

(Realme Buds Air 2 Teased to Come With 25 Hour Battery Life)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें