ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Realme C21Y ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार

स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme India आपला नवीन स्मार्टफोन Realme C21Y भारतात लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याची पुष्टी केली आहे.

ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Realme C21Y 'या' दिवशी भारतात लाँच होणार
Realme C21Y
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 4:54 PM

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme India आपला नवीन स्मार्टफोन Realme C21Y भारतात लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याची पुष्टी केली आहे की, हा फोन Realme.com वर 23 ऑगस्ट रोजी सादर केला जाईल. Realme C21Y गेल्या महिन्यात व्हिएतनाम मध्ये सादर करण्यात आला आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. यासोबत यात 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Unisoc T610 SoC ने सपोर्टेड आहे आणि यात 5000mAh ची बॅटरी आहे. यासह, यात मागच्या बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर देखील उपलब्ध आहे. (Realme C21Y smartphone will launch on 23rd august in India, check price and features)

कंपनीने हा फोन लॉन्च करणार असल्याची पुष्टी एका प्रेस रिलीझद्वारे केली आहे आणि Realme.com वर एक मायक्रोसाइट देखील तयार केली आहे. यावरुन अशी माहिती मिळाली आहे की, हा फोन क्रॉस ब्लू आणि क्रॉस ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला जाईल आणि त्याची किंमत व्हिएतनाम मॉडेलइतकीच असेल. व्हिएतनाममध्ये Realme C21Y च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या फोनच्या 3GB + 32GB मॉडेलची किंमत VND 3,240,000 (जवळपास 10,500 रुपये) आहे. त्याच वेळी, 4GB + 64GB मॉडेलची किंमत VND 3,710,000 (जवळपास 12,000 रुपये) इतकी आहे.

Realme C21Y चे स्पेसिफिकेशन्स

Realme C21Y Android 10 वर आधारित Realme UI वर चालतो आणि यात 6.5-इंच HD + (720 × 1,600 पिक्सेल) डिस्प्ले आहे. स्मार्टफोन Mali-G52 GPU सह जोडलेल्या Unisoc T610 SoC द्वारे सपोर्टेड आहे. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज स्पेस आहे जी स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येते.

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे, ज्यामध्ये पहिला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर कॅमेरा आहे. यात 5-मेगापिक्सलचा सेल्फी शूटर आहे. फोनला पॉवर देण्यासाठी, यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी रिव्हर्स वायर्ड चार्जिंगलादेखील सपोर्ट करते.

याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी, यात LTE, Wi-Fi, Bluetooth v5, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी मायक्रो-यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, त्याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.

इतर बातम्या

आता iOS वापरकर्तेही खेळू शकतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया, डाऊनलोडसाठी गेम उपलब्ध

भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार

रिअलमीने लाँच केले रिअलमी जीटी स्मार्टफोन आणि स्लिम बुक लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Realme C21Y smartphone will launch on 23rd august in India, check price and features)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.