AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार्जिंगचा वेळ वाचणार, हा स्मार्टफोन 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत होतोय फुल चार्ज, जाणून घ्या!

तुम्हाला कोणाला स्मार्ट फोन गिफ्ट करायचा असेल तर थोडं थांबा. कारण काही दिवसातच तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्टवाला स्मार्ट फोन तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

चार्जिंगचा वेळ वाचणार, हा स्मार्टफोन 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत होतोय फुल चार्ज, जाणून घ्या!
| Updated on: Jun 06, 2023 | 8:33 PM
Share

मुंबई : जर तुम्ही नवीन स्मार्ट फोन घ्यायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला कोणाला स्मार्ट फोन गिफ्ट करायचा असेल तर थोडं थांबा. कारण काही दिवसातच तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्टवाला स्मार्ट फोन तुम्हाला खरेदी करता येणार आहे. रियलमी लवकरच फ्लॅगशिप मॉडलची विक्री भारतात सुरू करू शकते.

रिअलमीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2023 मध्ये त्याचे फ्लॅगशिप मॉडल, Realme GT3 चे अनावरण केले आहे. या मोबाईलचे खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा मोबाईल 240W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme ने तीन ॲडव्हान्स चार्जिंग चीपसेट समाविष्ट केले आहेत. कंपनीने दावा केला आहे की, GT3 ची 4600mAH बॅटरी फक्त 9 मिनिटे 30 सेकंदात पूर्णपणे चार्ज होऊ शकते, जे मागील 17 मिनिटांच्या रेकॉर्डला मागे टाकत आहे.

टिपस्टरने केलेल्या ट्विटनुसार, Realme GT3 240W जून महिन्यात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसंच Realme GT3 240W ला TDRA आणि BIS प्रमाणपत्र मिळत असल्याचं समजलं. त्यामुळे लवकरच जागतिक स्तरावर या स्मार्ट फोनची विक्री सुरू होण्याची शक्यता आहे. आता या फोनमध्ये कोणते फीचर्स मिळतील याबाबत आपण जाणून घेऊयात.

दरम्यान, Realme GT3 240W Android 13 आणि Realme UI 4.0 सह लोड केला जाणार आहे. यात 144Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिं रेटसोबत 6.74 इंच 1.5K AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. या मोबाईलमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.