AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतत चार्जिंगचा ताण संपणार ! Realme 27 ऑगस्ट रोजी लाँच करणार असा स्मार्टफोन

रिअलमी कंपनी त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. तर कंपनीने X वर पोस्ट करून या फोनचा टीझर शेअर केला आहे आणि 27ऑगस्ट ही लाँच तारीख जाहीर केली आहे. फोनचे नाव अद्याप उघड झालेले नाही. चला तर मग आजच्या या लेखात आपण या स्मार्टफोन बद्दल जाणून घेऊयात...

सतत चार्जिंगचा ताण संपणार ! Realme 27 ऑगस्ट रोजी लाँच करणार असा स्मार्टफोन
सतत चार्जिंगचा ताण संपणार ! Realme 27 ऑगस्ट रोजी लाँच करणार 10 हजार mAh पेक्षा मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोनImage Credit source: TV9 Network/File /इनफिनिक्स
| Edited By: | Updated on: Aug 23, 2025 | 8:26 PM
Share

Realme कंपनीने यावर्षी मे महिन्यात 10000 mAh बॅटरी असलेला एक कॉन्सेप्ट स्मार्टफोन सादर केला होता, आता कंपनी आणखी मोठ्या बॅटरीसह एक नवीन फोन लाँच करण्याची घोषणा करत आहे. हँडसेटचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु कंपनीने लाँच करण्यात येणारा त्यांचा हा फोन चांगल्या वायर्ड चार्जिंग स्पीडला सपोर्ट करेल. तसेच कंपनीने Realme GT 7 ही सिरिज या वर्षी एप्रिल महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आली होती आणि या हँडसेटला 7200mAh मोठीबॅटरी देण्यात आली होती. भारतात हाच हँडसेट 7000mAh बॅटरी मध्ये उपलब्ध आहे.

रिअलमीचा आगामी फोन

X हँडलवरून एका पोस्टमध्ये, 27 ऑगस्ट रोजी Realme ने ‘1x०००mAh’ बॅटरी असलेल्या नवीन फोन लाँच करण्याची घोषणा केली. आता यामध्ये ‘x’ म्हणजे बॅटरी किमान 10,000mAh किंवा त्या पेक्षा जास्त पॉवर असलेल्या बॅटरीचा फोन असण्याची शक्यता आहे.

कंपनीच्या आणखी एका पोस्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की हा फोन आणखी मोठ्या बॅटरीसह येऊ शकतो. त्यात म्हटले आहे की ‘320 वॅट फास्ट चार्जिंगपासून ते 10,000 एमएएच बॅटरीपर्यंत… याचा अर्थ असा की येणारा रिअलमी हँडसेट पुढील जनरेशनसाठी मोठी बॅटरी आणि चार्जिंग तंत्रज्ञानासह येऊ शकतो.

तर रिअलमीच्या या हँडसेटचे नाव अद्याप उघड झालेले नाही. रिअलमी त्याच्या लाँचिंगपूर्वी येत्या काही दिवसांत अधिक माहिती सांगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मे महिन्यात, कंपनीने Realme GT कॉन्सेप्ट फोन प्रदर्शित केला ज्यामध्ये 10,000mAh बॅटरी आणि 320W फास्ट चार्जिंग सपोर्ट होता. हा फोन 8.5 मिमी पेक्षा कमी जाड होता, तसेच या फोनचे वजन 200 ग्रॅमपेक्षा थोडे जास्त होते आणि त्याचा बॅक सेमी ट्रांस्परेंट होता. त्याची ‘मिनी डायमंड’ आर्किटेक्चर मोठ्या बॅटरीमध्ये बसण्यासाठी अंतर्गत लेआउटची री-अरेंज करते.

दुसरीकडे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिअलमीने सादर केलेल्या 320 वॅटची सुपरसॉनिक चार्जिंग तंत्रज्ञान स्मार्टफोन फक्त चार मिनिटे आणि 30 सेकंदात 0 ते 100 टक्के चार्ज करण्याचा दावा कंपनीने केला आहे. फक्त एका मिनिटाच्या चार्जिंगमध्ये बॅटरी 26 टक्के चार्ज होऊ शकते, तर 50 टक्के चार्जिंगसाठी फक्त दोन मिनिटे लागतात असे म्हटले जाते.

सध्या Realme स्मार्टफोनमध्ये सर्वात मोठी बॅटरी Realme GT 7 च्या चिनी व्हेरिएंटमध्ये आहे, ज्यामध्ये 7,200mAh सेल आहे. तसेच हा फोन 100W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, तर त्याचा भारतीय व्हेरिएंट 7,000mAh बॅटरी आणि 120W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा