AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेडमीने लाँच केला स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 8000mAh बॅटरी असलेला नवीन फोन, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

रेडमीने भारतात त्यांचा नवीन 5G फोन लाँच केला आहे, ज्यामध्ये 7-इंचाचा AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 4 चिपसेट आणि 8,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स व उपलब्धता याबद्दल जाणून घेऊयात.

रेडमीने लाँच केला स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 8000mAh बॅटरी असलेला नवीन फोन, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स
रेडमी स्मार्टफोनImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 07, 2026 | 12:49 PM
Share

रेडमीने अखेर भारतात त्यांचा नोट सीरीजमध्ये एक नवीन 5G फोन लाँच केला आहे. कंपनीने हे डिव्हाइस भारतामध्ये रेडमी नोट 17 5G या नावाने सादर केले आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत या डिव्हाइसमध्ये मोठी बॅटरी, नवीन डिझाइन आणि बरेच काही आहे. दिवसभराच्या वापरासाठी या फोनमध्ये 8,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देखील आहे. या डिव्हाइसमध्ये 7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देखील आहे आणि ते स्नॅपड्रॅगन 400 जेन 4 चिपसेटवर चालते. चला तर मग प्रथम भारतातील Redmi Note 17 5G ची किंमत आणि नंतर त्याचे फिचर्स जाणून घेऊयात.

रेडमी नोट 17 5G ची किंमत

रेडमी नोट 17 च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 27 हजार 999 रुपये आहे, तर 8 जीबी रॅम असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 30 हजार 999 रुपये आहे. हे डिव्हाइस आर्क्टिक ब्लू, स्टारलाइट पर्पल आणि डार्क नाइट या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

कंपनी या फोनवर 3 हजार रुपयांपर्यंतची विशेष बँक सवलतही देत ​​आहे. हे डिव्हाइस 12 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हा फोन शाओमीच्या ई-स्टोअर, रिटेल चॅनेल्स आणि ॲमेझॉनवरून खरेदी करू शकता.

रेडमी नोट 17 5G ची फिचर्स

फिचर्सच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, या फोनमध्ये 7-इंचाचा ट्रू-कलर AMOLED डिस्प्ले आहे. तसेच, यात 120Hz अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्सची पीक ब्राइटनेस आहे. हायड्रोटच 2.0 (HydroTouch 2.0) देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही ओल्या बोटांनी फोन वापरू शकता. या डिव्हाइसला लो ब्लू लाइट आणि PWM डिमिंगसाठी TÜV राईनलँड (TÜV Rheinland) प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

या फोनमध्ये 4nm स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट आहे. या डिव्हाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत हा फोन हायपरओएस 3 सह अँड्रॉइड 16 वर चालतो आणि शाओमीने चार वर्षांचे ओएस अपडेट्स आणि सहा वर्षांचे सुरक्षा पॅचेस देण्याचे आश्वासन दिले आहे.

रेडमी नोट १७ ५जी कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी या डिव्हाइसमध्ये 2x इन-सेन्सर झूम, नाईट मोड, एआय-आधारित एचडीआर आणि सीन डिटेक्शनसह 50MP एआय कॅमेरा आहे. फोनमध्ये 8MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. याव्यतिरिक्त, या डिव्हाइसमध्ये 8,000mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे, जी 45W वायर्ड चार्जिंग आणि 22.5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन