Replacement Policy | वस्तू खरेदी करुनही मनस्ताप! ॲमेझॉनसह फ्लिपकार्टने रिप्लेसमेंट पॉलिसी बदलवली

Replacement Policy | ॲमेझॉनसह फ्लिपकार्टवरुन अनेक जण वस्तू खरेदी करतात. त्यात अनेक प्रकारच्या वस्तू असतात. मोठी सवलत मिळत असल्याने ऑनलाईन ई-कॉमर्सला पहिली पसंती मिळते. पण आता या प्लॅटफॉर्मवरुन वस्तू खरेदी तुमच्या डोक्याला तापदायक ठरेल. कारण या कंपन्यांनी वस्तू बदल करण्याच्या धोरणात मोठ बदल केला आहे. काय आहे हा बदल...

Replacement Policy | वस्तू खरेदी करुनही मनस्ताप! ॲमेझॉनसह फ्लिपकार्टने रिप्लेसमेंट पॉलिसी बदलवली
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 11:36 AM

नवी दिल्ली | 16 February 2024 : जर तुम्ही देशातील मोठ्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर, ॲमेझॉनसह फ्लिपकार्टवरुन सामान, वस्तू खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने त्यांच्या Replacement Policy मोठा बदल केला आहे. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेली एकादी वस्तू खराब जर झाली तर तुम्हाला आता ती लागलीच बदलवून मिळणार नाही. तुमच्या डोक्याला विकतचा ताप होणार आहे. वस्तू विकत घेऊन ती बदलण्यासाठी मनस्ताप होईल, काय झाला आहे बदल? जाणून घ्या..

ॲमेझॉनसह फ्लिपकार्टने केला मोठा बदल

  • ॲमेझॉनसह फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या डिजिटल रिप्लेसमेंट पॉलिसीत बदल केला आहे. या कंपन्यांनी 7 दिवसात वस्तू बदल करण्याची योजना बंद केली आहे. पूर्वी या कंपन्या खराब अथवा भलतंची वस्तू पाठविल्यास ती बदलवू देत होती. त्याऐवजी ॲमेझॉन फ्लिपकार्टने आता सर्व्हिस सेंटरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे तुम्हाला खराब वस्तू बदलायची असेल तर सर्व्हिस सेंटर हुडकून तिथे वस्तू द्यावी लागेल. त्यानंतर नवीन उत्पादन येईपर्यंत या सेवा केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागतील.
  • ग्राहकांना आता घर बसल्या सामान, वस्तू बदलण्याची सुविधा मिळणार नाही. ॲमेझॉनसह फ्लिपकार्टने हा नियम बदलल्यामुळे त्याचा मोठा फटका ग्राहक सेवेवर होईल. माल, उत्पादन दुय्यम निघाल्यास ग्राहकांना पैसे मोजून मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 7 Days Replacement मध्ये बदल करत 7 Days Service Centre Replacement असा बदल केला आहे.

आता वस्तू बदल अवघड

हे सुद्धा वाचा

जर तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरुन एखादी डिजिटल वस्तू, उत्पादन खरेदी केल्यास, त्यात स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इयरबड्स खरेदी केल्यास, तुमच्या जवळचे सर्व्हिस सेंटर कुठे आहे, त्याची माहिती घेऊन ठेवा. जर हे उत्पादन खराब निघाले तर तुम्हाला तात्काळ सेवा केंद्रावर जाऊन त्यासंबंधीची तक्रार करता येईल आणि हे उत्पादन कधी मिळणार याची माहिती घेता येईल. पण या धोरणामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार हे नक्की.

Non Stop LIVE Update
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.