WhatsApp | माहिती लीक होण्याची भीती? असा करा व्हॉट्सअ‍ॅपचा जुना डेटा डिलीट…

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Jan 20, 2021 | 4:38 PM

नव्या गोपनीयता धोरणाशी सहमत नसल्याने बरेच लोक आपल्या फोनमधून हे अ‍ॅप हटवत आहेत आणि त्याऐवजी इतर पर्यायांचा वापर करत आहेत.

WhatsApp | माहिती लीक होण्याची भीती? असा करा व्हॉट्सअ‍ॅपचा जुना डेटा डिलीट...

मुंबई : नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप खूप चर्चेत आहे. या नव्या गोपनीयता धोरणाशी सहमत नसल्याने बरेच लोक आपल्या फोनमधून हे अ‍ॅप हटवत आहेत आणि त्याऐवजी इतर पर्यायांचा वापर करत आहेत. परंतु, केवळ व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशन काढून टाकल्याने त्यातील डेटा देखील डिलीट होईल, असे वाटत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशन डिलीट करणे आणि व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट डिलीट करणे यात मोठा फरक आहे (Right process for securely delete WhatsApp Data).

तसेच, जर तुम्हाला तुमचा जुना बॅकअप हटवायचा असेल, तर त्याचीही वेगळी प्रक्रिया आहे. यासह आपण आपला जुना डेटा योग्य प्रकारे हटवू शकाल आणि त्यानंतर कोणीही तो डेटा वापरू शकणार नाही. आपला जुना डेटा हटवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने नमूद केलेल्या या स्टेप्स फॉलो करू शकता. वास्तविक, आपली चेक हिस्ट्री sdcard/WhatsApp/Databases/ folder मधून डिलीट होते. अशा वेळी, आपल्याला या फोल्डरमध्ये जाऊन आपला डेटा हटवावा लागतो.

डेटा हटवण्याची प्रक्रिया

– व्हॉट्सअ‍ॅपचा जुना डेटा हटवण्यासाठी प्रथम आपल्या मोबाईलमधील फाईल मॅनेजरमध्ये जा.

– यानंतर व्हॉट्सअ‍ॅप फोल्डरवर क्लिक करा. त्यानंतर तिथे सब-फोल्डर्स दिसू लागतील.

– त्यात डेटाबेस फाईल नावाच्या फोल्डरवर क्लिक करून ठेवा.

– क्लिक करून ठेवल्यानंतर डिलीटचा पर्याय येईल.

किती दिवसांत डेटा होईल?

आपण व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट डिलीट केल्यानंतर त्यातील डेटा डिलीट होण्यासही सुरूवात होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आपला डेटा 90 दिवसांत पूर्णपणे हटवला जातो. रिकव्हरीसाठी हा डेटा 90 दिवस ठेवला जातो.  कारण, जर चुकून तुमचे खाते डिलीट झाले असेल, तर त्या परिस्थितीत पुन्हा डेटा रिलीझ केला जातो. मात्र, 90 दिवसानंतर व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित सर्व डेटा डिलीट केला जातो.

याशिवाय डेटाचा काही भाग कायदेशीर अडचणी, मुदतीचे उल्लंघन इत्यादीमुळेही सेव्ह झालेला असतो. अशाप्रकारे अकाऊंट डिलीट केल्यानंतर फेसबुक कंपन्यांना दिलेला डेटाही डिलीट होतो.

त्याचबरोबर तुम्हालाही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट डिलीट करायचे असेल, तर तुम्हाला एक प्रक्रिया फॉलो करावी लागेल. त्यानंतरच, आपले खाते पूर्णपणे हटवले जाईल आणि याद्वारे आपण आपला डेटा जतन करण्यात सक्षम व्हाल. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अधिकृत वेबसाईटवर देखील अकाऊंट डिलीट करण्याचा एक खास मार्ग सांगितला आहे, ज्याद्वारे आपल्याला खाते डिलीट करता येईल (Right process for securely delete WhatsApp Data).

अकाऊंट डिलीट करण्यासाठी :

– यासाठी प्रथम व्हॉट्सअ‍ॅप उघडा.

– यानंतर ऑप्शन्सवर जा आणि सेटिंग्जवर क्लिक करा.

– यात तुम्हाला Account पर्याय मिळेल, त्यानंतर DELETE MY ACCOUNT वर क्लिक करा.

– यानंतर, आपल्याला आपला फोन नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि विशेषतः हे लक्षात ठेवावे लागेल की आपला नंबर आपल्याला आंतरराष्ट्रीय स्वरुपात टाकायचा आहे. यासाठी आपल्याला मोबाईल क्रमांका आधी ‘+91’ टाकावे लागेल.

– यानंतर व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करण्यामागील कारण विचारले जाईल. त्यातील एखादे कारण निवडा.

– त्यानंतर DELETE MY ACCOUNT वर क्लिक करा. यानंतर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट पूर्णपणे डिलीट होईल.

अकाऊंट डिलीट झाल्यावर काय होईल?

– या प्रक्रियेनंतर आपले खाते पूर्णपणे हटवले जाईल.

– त्याचबरोबर आपल्या मेसेजची हिस्ट्री देखील पूर्णपणे हटवली जाईल.

– आपले सर्व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप हटवले जातील.

– इतकेच नाही तर गुगल ड्राईव्हवर सेव्ह केलेला तुमचा बॅकअपही हटवला जाईल.

– यानंतर, कोणीही आपल्या खात्यात प्रवेश करू शकणार नाही.

(Right process for securely delete WhatsApp Data)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI