रॉयल एन्फिल्डने सात हजार बुलेट परत मागवल्या

रॉयल एन्फिल्डने सात हजार बुलेट परत मागवल्या
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350(Classic 350)च्या किंमतीत वाढ

मुंबई : रॉयल एन्फिल्डने (Royal Enfield) तब्बल सात हजार गाड्या परत मागवल्या आहेत. या गाड्यांची 20 मार्च 2019 ते 30 एप्रिल 2019 या दरम्यान विक्री झाली होती. या गाड्यांच्या ब्रेक कॅलिपर बोल्टमध्ये बिघाड आल्याने  कंपनीने या गाड्या परत मागवल्या आहेत.

रॉयल एन्फिल्डने Bullet 500, Bullet 350 आणि Bullet 350 ES या मॉडलच्या गाड्या रिकॉल केल्या आहेत. कंपनी या गाड्यांची सर्व्हिसिंग करुन खराब ब्रेक कॅलिपर बोल्टला रिप्लेस करणार आहे. ब्रेक कॅलिपर्स ब्रेकिंग सिस्टीमचे महत्त्वाचे कम्पोनंट असतात. हे ब्रेक कॅलिपर आणि होजला सुरक्षित ठेवण्याचं काम करतात.

गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल 2019 मध्ये रॉयल एन्फिल्डच्या विक्रीमध्ये एकूण 17 टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षी रॉयल एन्फिल्डच्या 62,879 गाड्यांची विक्री झाली आहे.

Bullet 350 आणि Bullet 350 ES चे स्पेसिफिकेशन :

रॉयल एन्फिल्ड Bullet 350 आणि Bullet 350 ES मध्ये 346cc, सिंगल सिलेंडर, 4-स्ट्रोक, ट्विनस्पार्क, एअर-कुल्ड इंजिन असतं. हे इंजिन 19.8bhp पॉवर आणि 28Nm चा पिक टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन असतं. नुकतंच रॉयल एन्फिल्डने Bullet 350 आणि Bullet 350 ES ला सिंगल चॅनल ABS सोबत लॉन्च करण्यात आलं होतं.

Bullet 500 चे स्पेसिफिकेशन :

रॉयल एन्फिल्ड Bullet 500 मध्ये 499cc, सिंगल सिलेंडर, 4-स्ट्रोक, स्पार्क-इग्निशन, एअर-कुल्ड इंजिन, फ्यूएल इंजेक्शन इंजिन आहे. यासोबतच या गाडीत 5-स्पीड गिअरबॉक्सही असतो. या गाडीच्या समोरील भागात 2-पिस्टन कॅलिपरसोबत 280mm डिस्क आणि रिअरमध्ये सिंगल पिस्टन कॅलिपरसोबत 240mm ची डिस्क देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

कॉलेज तरुणांसाठी खास विजेवर चालणारी स्कूटी

कॉलेज तरुणांसाठी खुशखबर, दुकाटीची स्वस्त बाईक भारतात लॉन्च

शाओमीची नवी बाईक लाँच, किंमत किती?

मारुती सुझुकीचा मोठा निर्णय, लवकरच डिझेल कारचं उत्पादन थांबणार

Published On - 11:08 am, Wed, 8 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI