सॅमसंगने 2 मोबाईलच्या किमती गुपचूप घटवल्या, 4 कॅमेऱ्याचा स्मार्टफोनही स्वस्त

सॅमसंगने 2 मोबाईलच्या किमती गुपचूप घटवल्या, 4 कॅमेऱ्याचा स्मार्टफोनही स्वस्त

मुंबई : सॅमसंगने Galaxy A9 (2018)  आणि Galaxy A7 (2018) च्या किमती कमी केल्या आहेत. कंपनीने गुपचूपपणे या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात केली. नव्या किमती सॅमसंगच्या वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत. शिवाय मुंबईतील मोबाईल शॉपी, रिटेलर्सनीही किमती घटल्याची माहिती दिली.

Galaxy A7 (2018) ची किंमत जानेवारी महिन्यातही कमी केली होती. तर Galaxy A9 (2018) च्या किंमतीत एप्रिलमध्ये कपात करण्यात आली होती. कंपनीच्या वेबसाईटवरील अपडेट लिस्टनुसार, सॅमसंग गॅलक्सी A9 (2018) ची किंमत 28 हजार 990 वरुन 25 हजार 990 रुपये करण्यात आली आहे. ही किंमत 6GB + 128GB व्हेरिएंटची आहे. तर 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 31,990 रुपयांवरुन 28,990 इतकी करण्यात आली आहे. हा फोन कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 36,990 रुपये किमतीत लाँच केला होता.

दुसरीकडे Galaxy A7 (2018) च्या किमतीतही घट झाली आहे. या फोनच्या 6GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 18 हजार 990 रुपयांवरुन 15 हजार 990 रुपये करण्यात आली आहे. तर 6GB + 128GB फोनची किंमत 22,990 वरुन 19,990 पर्यंत घटवण्यात आली आहे. हा फोन कंपनीने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये 23,990 रुपयात लाँच केला होता.

दरम्यान, कंपनीने या किमती ठराविक मुदतीसाठी घटवल्या की कायमस्वरुपी याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ग्राहकांना हा फोन ऑनलाईन तसंच सॅमसंग रिटेलर स्टोअरमध्येही मिळू शकेल.

Samsung Galaxy A9 (2018) चं वैशिष्ट्य म्हणजे या मोबाईलला तब्बल 4 कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी 24 मेगापिक्सल कॅमेरा आहे. याचा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 660 हा आहे. तर Galaxy A7 (2018) या मोबाईलमध्ये 3 रियर कॅमेरे आहेत.

Published On - 1:14 pm, Sat, 11 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI